Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गणपती विसर्जन डीजे गुन्हा

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे लावल्याने मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

Ganpati immersion DJ Crime: येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत विनापरवाना वाहनात डीजे लावून पोलिसाच्या सूचनाचे पालन न केल्याने व कर्कश आवाज सोडून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस


गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे लावल्याने मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

Ganpati immersion DJ Crime |

औंढा नागनाथ (Ganpati immersion DJ Crime) : येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत विनापरवाना वाहनात डीजे लावून पोलिसाच्या सूचनाचे पालन न केल्याने व कर्कश आवाज सोडून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गणपती मंडळाचे अध्यक्ष, डीजे चालक-मालक, डीजे वाहन चालक-मालक अशा तब्बल २८ जणांसह गणपती मंडळाच्या इतर सदस्यावर २६ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी २५ लाखावर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

२५ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ येथील मानाच्या बारा गणपतीची शहराच्या प्रमुख मार्गाने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत डीजेवर बंदी असतानाही औंढा नागनाथ येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यात आले होते. याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन डीजे चालक-मालक, डीजे वाहन चालक मालक यांच्यासह त्या त्या गणेश मंडळाच्या अध्यक्षावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २५ लाखावर मुद्देमाल ही जप्त करण्यात आला असून, कारवाईने डीजे चालकाचे चांगलेच धाबे दणानले आहेत. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी डीजेवर बंदी असल्याने विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही गणेश मंडळांनी डीजे लावणे असे आवाहन केले होते व याबाबत जनजागृतीही केली होती.

परंतु काही गणेश मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे (Ganpati immersion DJ Crime) लावला व पोलिसांच्या सूचनाचे पालन केले नाही. तसेच डिजेचा कर्कश आवाज करून ध्वनी प्रदूषण केल्याने पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून आठ डीजे सह तब्बल २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही दोन डीजे वर गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरू होती. तर यामध्ये काही डीजे चालक आणि पळ काढला त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस,जमादार संदीप चंद्रशेखर, जमादार रविकांत हरकळ हे करत आहेत.