Ganja Seizure

शेतात गांजाची लागवड; १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त!

रतनवाडी येथे गांजाची लागवड उघड; मानोरा पोलिसांची कारवाई, १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त, ७० वर्षीय शेतकरी ताब्यात.

शेतात गांजाची लागवड; १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त!

२ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात; ७० वर्षीय शेतकऱ्याला घेतले ताब्यात

मानोरा : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे रतनवाडी येथील एका शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. मानोरा पोलिसांनी २ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, याप्रकरणी शेतकरी नारायण किसन व्यवहारे (वय ७० वर्षे) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रतनवाडी येथील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्यासह ठाणेदार पोहेकर यांनी शेतात छापा टाकला.

यावेळी व्यवहारे यांच्या शेतात १५ किलो २२५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. प्रतिकिलो १५ हजार रुपये दराने जप्त गांजाची किंमत २ लाख २६ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी नारायण व्यवहारे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया करण्याची कारवाई सुरू आहे.

सदर कारवाई उपविभागीय अधिकारी ठाकरे, ठाणेदार पोहेकर, फॉरेन्सिक लॅब पथकाचे उपनिरीक्षक अनिल इंगळे, पोलीस कर्मचारी राधेश्याम महल्ले, रोहन तायडे आणि गोकुळ सुषमा लोखंडे यांनी केली.

संबंधित सामग्री

अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; 7 कोटींच्या खंडणीची मागणी

अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; 7 कोटींच्या खंडणीची मागणी

Threat to Arvind Kejriwal: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत सात कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार

Nov 12, 2026
नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

कळंबोलीत नाकाबंदीदरम्यान पोलिस कॉन्स्टेबलला कारने २०० मीटर फरफटले. दिलीप भोई गंभीर जखमी; बनावट नंबर प्लेट असलेल्या कारमधील आरोपींचा शोध सुरू.

Nov 11, 2026
पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

राजगुरुनगरमध्ये गाडीला कट मारल्याच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांचा शिवम करमारेवर कोयत्याने हल्ला. तीन बोटे तुटली, शरीरावर ७०० टाके.

Nov 11, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026
मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मनोज जरांगे पाटील यांचे मानोरा शहरात आगमन होताच समाजबांधव आणि शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Nov 09, 2026