Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Gambling Raid

गव्हा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गव्हा येथे सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना रंगेहात पकडले.


गव्हा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मानोरा : मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गव्हा येथे सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना रंगेहात पकडले. ही कारवाई २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल आणि ताशाच्या पत्त्यांसह एकूण ४६ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हा बिटचे पोलीस अंमलदार मदन रामकृष्ण पुणेवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गव्हा येथील जगदंबा हॉटेलच्या बाजूच्या गल्लीत काही इसम ५२ पत्त्यांवर पैशांची हार-जीत करत जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच पोलीस पथकाने स्टाफ आणि पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.

पोलिसांची कारवाई सुरू होताच तेथे जुगार खेळणाऱ्या तीन इसमांपैकी एक जण पळून गेला, तर दोघांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे कमल गणेश चव्हाण (वय ३०) आणि ऋषीकेश किशोर राठोड (वय २५), दोघेही रा. गव्हा, अशी आहेत.

आरोपींची अंगझडती घेतली असता कमल चव्हाण याच्याकडून तीन ताशाचे पत्ते, ७४० रुपये रोख तसेच १५ हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तर ऋषीकेश राठोड याच्याकडून तीन ताशाचे पत्ते, ५९० रुपये रोख आणि १५ हजार रुपये किमतीचा मोरपंखी रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळून आला.

या कारवाईत एकूण ४६ ताशाचे पत्ते, ७४० रुपये रोख रकमेसह ४६ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बीट पोलीस हवालदार मदन पुणेवार करीत आहेत.

Related to this topic: