कोरची (Gadchiroli Zilla Parishad) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आज क्षेत्रीय भेटीदरम्यान अंगणवाडी, शाळा तसेच महिला स्वयंरोजगार उपक्रमांना भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, पोषण आहार, स्वच्छता व शैक्षणिक वातावरणाची पाहणी केली. तसेच शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शाळेतील शैक्षणिक सुविधा आणि उपलब्ध व्यवस्थेची माहिती घेतली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही त्यांनी माहिती घेतली. महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले व्यवसाय, स्वयंरोजगार उपक्रम, उत्पादक गटाच्या माध्यमातून सुरु आसलेले उपक्रम विषयी माहिती जाणून घेतली.
एकल महिलांच्या आर्थिक समवेशन करीता, त्यांना उपजीविकेची विविध साधनाची निर्मिती करुन देणे या करीता उमेद अभियाना मार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने मुख कार्यकारी अधिकारी यानी बेलगाव घाट येथील एकल महिला विनुषा मोहुर्ले, रसिका मोहुर्ले यांची भेट घेऊन त्याच्या व्यवसायाची माहिती घेतली, तसेच इमानुयेल उत्पादक गटानी सुरु केलेल्या मध संकलन प्रकल्पची पाहणी केली.या वेडी गट विकास अधिकारी राजेश फाये, CDPO अक्षय दोनाडकर,आणि विविध विभागाचे विभाग प्रमुख, व कर्मचारी उपस्थित होते