Fox Attack

अखेर पिसाळलेल्या कोल्ह्याचा बैलाच्या लाथेने मृत्यू

पिसाळलेल्या कोल्ह्याने नागरिक आणि जनावरांना चावा घेतल्याने खानापूर चित्ता परिसरात भीती होती. अखेर बैलाच्या लाथेने कोल्ह्याचा मृत्यू झाला.

अखेर पिसाळलेल्या कोल्ह्याचा बैलाच्या लाथेने मृत्यू

Fox Attack

शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण संपले

खानापूर चित्ता : परिसरात पिसाळलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या एका कोल्ह्याने नागरिकांसह जनावरांना चावा घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी कैलास पाईकराव यांच्या नाकाला तर अर्जुन पवार यांच्या पायाच्या मांडीला चावा घेतल्याने दोघेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे उपचार घेत आहेत. त्याचबरोबर विठ्ठल शहाजी जाधव यांच्या जनावरांना चावा घेतला होता. सदरील जनावरांना औषध उपचार केले असून जनावर सुखरूप असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जनावरांच्या गोठ्याजवळ आलेल्या या कोल्ह्याने बैलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क झालेल्या बैलाने जोरदार लाथ मारल्याने कोल्हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून परिसरात एक कोल्हा पिसाळलेल्या अवस्थेत फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी तो मानवी वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेत होते.

दरम्यान, संबंधित कोल्हा एका शेतातील जनावरांच्या गोठ्याजवळ पोहोचला. त्याने बैलाच्या दिशेने धाव घेत झडप घालण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बैलही आक्रमक झाला आणि त्याने कोल्ह्याला जोरदार लाथ मारली. या लाथेमुळे कोल्हा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

संबंधित सामग्री

प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

Hingoli Voter List: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल..

Oct 14, 2026
'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' व 'तिशीचा पल्ला तपासणी अन् सल्ला' अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' व 'तिशीचा पल्ला तपासणी अन् सल्ला' अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

Hingoli Health Assistants: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण संघ, हिंगोली येथे जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका आणि कार्यक्रम सहाय्यक यांची आढ

Oct 14, 2026
दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

Vinayak Sarnaik: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. मात्र, जागेचा अभाव, आर्थिक अडचणी, रेतीची अनुपलब्धता, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च.

Oct 14, 2026
..अखेर दिवाळी सुट्टीचे पत्र निघाले; २० दिवसांच्या सुट्ट्यांचा मिळणार आनंद

..अखेर दिवाळी सुट्टीचे पत्र निघाले; २० दिवसांच्या सुट्ट्यांचा मिळणार आनंद

Hingoli Zilla Parishad: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे पत्र निघाल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Oct 14, 2026
हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

Hingoli Municipal Council Fire Brigade: शहरातील मारवाडी गल्ली भागात एका घरामध्ये साठवणुक केलेल्या फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

Oct 14, 2026