माजी आमदार संतोष टारफे

माजी आमदार संतोष टारफे यांचा उद्या शिव सेनेत प्रवेश

Former MLA Santosh Tarfe: कळमनुरी विधानसभा मतदार संघातील उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठे शिलेदार माजी आमदार डॉ. संतोष टारफे (Former MLA Santosh Tarfe) बुधवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार संतोष टारफे यांचा उद्या शिव सेनेत प्रवेश

Former MLA Santosh Tarfe

 

शिवसेना उबाठाकडून लढविली होती विधानसभा निवडणूक

हिंगोली (Former MLA Santosh Tarfe) : कळमनुरी विधानसभा मतदार संघातील उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठे शिलेदार माजी आमदार डॉ. संतोष टारफे (Former MLA Santosh Tarfe) बुधवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. त्यांचा हा प्रवेश म्हणजे महाविकास आघाडी सहीत भारतीय जनता पक्षालाही धक्का मानला जात आहे. 

बहूजन समाज पार्टी मधून आपला राजकीय प्रवास सुरू केलेल्या डॉ. संतोष टारफे (Former MLA Santosh Tarfe) यांना काँग्रेस पक्षात गेल्यानंतर यश मिळाले. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर डॉ. संतोष टारफेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश घेतला. दोन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी शिवसेना उबाठा कडून आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिले होते. काँग्रेसकडून कै. राजीव सातवांसमोर पराभूत झाल्यानंतर टारफेंनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. त्याची पुनरावृत्ती करून त्यांनी पुन्हा ज्या आ.संतोष बांगरांसमोर पराभूत झाले, त्यांच्याच नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. 

एक उच्चशिक्षित व निष्कलंक कार्यकर्ता अशी ओळखल असलेले संतोष टारफे यांनी आदिवासी युवक कल्याण सभेमार्फत राज्यभरातील आदिवासी बांधवांसाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक आदिवासी चेहरा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. आ.संतोष टारफे (Former MLA Santosh Tarfe) हे काँग्रेसचे आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांचे जावाई आहेत.