शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करणार शिवसेना तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी
सेनगाव (Fire at Mhalsi Gotha) : तालुक्यातील म्हाळसी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रविण उत्तम भुक्तर यांच्या गोठ्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीमध्ये दोन म्हशी, वगार, आठ ते दहा शेळ्या, कुत्रा, सोलर मोटार, सोयाबीन तसेच संसारोपयोगी साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाची विचारपूस केली. त्यांनी आ. संतोष बांगर व युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अमोल खिल्लारी यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सेनगावचे तहसीलदार व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने कळवून नुकसानीचा पंचनामा करण्याची विनंती केली, जेणेकरून शेतकऱ्याला शासकीय मदत मिळण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल.
अल्पभूधारक शेतकऱ्यावर ओढवलेल्या या संकटाच्या काळात शिवसेनेने तत्परतेने धाव घेत आर्थिक मदत केली असून, नुकसानग्रस्त कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी, उपतालुकाप्रमुख गजानन गांधीले, युवा सेना हिंगोली विधानसभा अध्यक्ष शंकर सावळे, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख समीर पठाण, विशाल भुक्तर, बौद्धशाल वाठोरे, प्रवीण वाठोरे, करण वाठोरे, सुधाकर खडसे, अमन पठाण, पोलीस पाटील साबेर पठाण, बाबुराव इंगोले, हर्षल धाबे, भास्कर वाठोरे, बाबर पठाण, डॉ. गजानन खडसे, कलीम पठाण, तुळशीराम वाठोरे आदी उपस्थित होते.