Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मुंबई

FDA Maharashtra

तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात FDAची धडक कारवाई; ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी, ११ परवाने निलंबित

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.


तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात fdaची धडक कारवाई ४५ हॉटेल रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी ११ परवाने निलंबित

FDA Maharashtra |

MCAच्या परमिट रूमसह मुंबईतील अनेक आस्थापनांवर कारवाई; ३३ ठिकाणी सुधारणा नोटिसा

मुंबई : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आज राज्यातील ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्रुटी आढळलेल्या ३३ आस्थापनांना सुधारणा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, गंभीर नियमभंग झालेल्या ११ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमचाही समावेश आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमची FDA अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता किचनमधील एका फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याचे आढळले. तसेच स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ होती. FSSAIचा परवाना ठळक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला नव्हता.

तपासणीदरम्यान खाद्यतेलाची नियमितपणे रंग, वास आणि इतर निकषांच्या आधारे तपासणी केली जात नसल्याचेही निदर्शनास आले. कृषीजन्य कच्चा माल खराब स्थितीत आढळला, तर कर्मचारी स्वच्छता आणि सॅनिटेशनसंदर्भातील अपेक्षित मानकांचे पालन करत नसल्याचेही स्पष्ट झाले. या त्रुटींनंतर FDAने संबंधित परमिट रूमचा अन्न परवाना निलंबित केला.

कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा मानकांचे पालन करताना गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. तपासणीवेळी अन्न तयार करण्याची जागा स्वच्छ आणि आरोग्यदायी स्थितीत नसल्याचे दिसून आले.

संबंधित परिसरात घाण, अन्नाचे अवशेष आणि अपुरी स्वच्छता आढळली. भिंती, छत तसेच इतर भागांवर डाग, ग्रीस, घाण आणि झीज असल्याचे निदर्शनास आले. आस्थापनेतील अंतर्गत पृष्ठभाग आणि विविध फिटिंगही अस्वच्छ व खराब अवस्थेत असल्याचे FDAच्या पथकाला आढळून आले.

दरम्यान, दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील Cafe Cadell येथेही अधिकाऱ्यांनी तपासणी केली. किचनमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळून आले, तर दरवाजे गुळगुळीत झालेले होते. किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची कमतरता होती. कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक व्यवस्था अपुऱ्या असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.

याशिवाय शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ स्वतंत्रपणे व योग्य पद्धतीने साठवले जात नसल्याचेही आढळले. या गंभीर त्रुटींची नोंद घेत अन्न व औषध प्रशासनाने Cafe Cadellचा परवाना निलंबित केला आहे.

Related to this topic: