परभणी शेतकरी आत्महत्या

परभणीत धानोरा देवगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer Suicides: जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दित असलेल्या धानोरा देवगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या..

परभणीत धानोरा देवगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer Suicides

 

पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान लिंबाच्या झाडाला घेतला गळफास

परभणी/ बोरी (Parbhani Farmer Suicides) : जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दित असलेल्या धानोरा देवगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. लिंबाजी संतोबा सानप वय ४८ वर्ष, असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. पावसाने दिलेली उघडीप आणि पिकांचे झालेले नुकसान या विवंचनेत शेतकर्‍याने टोकाचे पाऊल उचलले. 

धानोरा देवगाव येथील शेतकरी लिंबाजी सानप यांनी शुक्रवारी सकाळी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुष्काळ परिस्थितीमुळे शेती पिकांना फटका बसला असून पावसा अभावी सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक अडचण आणि नैराश्यातून सानप यांनी टोकाचे पाऊल उचलले. (Parbhani Farmer Suicides) आत्महत्ये मागील नेमके कारण अधिकृतरित्या स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सपोनि. शिवसांभ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. एस.एन. थोरवे, बीट जमादार आबुज यांनी रुग्णालयात जात प्राथमिक पंचनामा केला. मयत लिंबाजी सानप यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

संबंधित सामग्री

परभणीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत विहिरीत घेतली उडी

परभणीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत विहिरीत घेतली उडी

Parbhani Farmer suicides: शेतीसाठी वडिलांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे, पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी झालेला खर्च आणि पावसामुळे शेतीवरील खर्च कसे निघेल, या विवंचनेत एका तरुण शेतकर्‍यांची आत्महत्या...

Oct 14, 2026
परभणीतील मिरखेल येथील शेतकर्‍याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

परभणीतील मिरखेल येथील शेतकर्‍याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Parbhani Farmer suicides: पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. जुन महिन्यात शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. परंतु पेरणीसाठी लागलेला खर्च देखील निघणार नाही...

Sep 27, 2026