परभणी शेतकरी आत्महत्या

नापिकी, कर्जाला कंटाळून विहिरीत घेतली उडी

Parbhani Farmer Suicides:

नापिकी, कर्जाला कंटाळून विहिरीत घेतली उडी

Parbhani Farmer Suicides

 

परभणी तालुक्यातील साडेगाव येथील घटना; ग्रामीण पोलिसात नोंद

परभणी (Parbhani Farmer Suicides) : शेतातील सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत एका ५५ वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. सदर प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरंग मुगाजी हराळे वय ५५ वर्ष, रा. साडेगाव ता.जि. परभणी, असे मयताचे नाव आहे. या बाबत शिवाजी हराळे यांनी खबर दिली आहे. श्रीरंग हराळे हे शेतातील सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत होते. यातच त्यांनी गुरुवारी आपल्या शेत गट क्रमांक ४१८ मधील बोबड टाकळी शेत शिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. 

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नामदेव रिठे, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, पोउपनि. मोहिते, पोलीस अंमलदार जाधव यांनी भेट दिली. ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत धानोरा देवगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

परभणीत धानोरा देवगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer Suicides: जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दित असलेल्या धानोरा देवगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या..

Oct 23, 2026
परभणीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत विहिरीत घेतली उडी

परभणीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत विहिरीत घेतली उडी

Parbhani Farmer suicides: शेतीसाठी वडिलांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे, पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी झालेला खर्च आणि पावसामुळे शेतीवरील खर्च कसे निघेल, या विवंचनेत एका तरुण शेतकर्‍यांची आत्महत्या...

Oct 14, 2026
परभणीतील मिरखेल येथील शेतकर्‍याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

परभणीतील मिरखेल येथील शेतकर्‍याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Parbhani Farmer suicides: पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. जुन महिन्यात शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. परंतु पेरणीसाठी लागलेला खर्च देखील निघणार नाही...

Sep 27, 2026