Farmer Suicide

पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

उजनी येथील ४६ वर्षीय शेतकरी श्रीमंत बिभीषण वळके यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने ही घटना घडली.

पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

Farmer Suicide

औसा : तालुक्यातील उजनी येथे ४६ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून आपल्या शेतातील कोठ्यास गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रीमंत बिभीषण वळके (वय ४६ वर्षे, रा. उजनी, ता. औसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे उजनी परिसर आणि भादा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत श्रीमंत वळके यांच्या नावावर विविध कार्यकारी सोसायटीचे ५६ हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच मागील दीड महिन्यापासून पावसाने संपूर्णपणे दडी मारल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके डोळ्या देखत जळून चालली होती. पेरणी आणि फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने आणि मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज व लोकांचे उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे, या मोठ्या आर्थिक विवंचनेत ते मागील महिनाभरापासून होते.

याच सततच्या मानसिक तणावातून त्यांनी शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:४५ वाजेच्या सुमारास उजनी शिवारातील स्वतःच्या शेतातील कोठ्याच्या आडूला लाल रंगाच्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मयताचे भाऊ बळवंत विभीषण वळके (वय ४८ वर्षे) यांनी भादा पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या खबरीवरून भादा पोलीस स्टेशन येथे आ.मृ.नं. 36/2026, कलम १९४ बीएनएसएस अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपासाची चक्रे फिरली असून, दाखल अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) एम. एम. तांबरे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवालदार शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

कर्जबाजारीपणा आणि निसर्गाची अवकृपा यामुळे आणखी एका बळीराजाला आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण औसा तालुका आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित सामग्री

नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १३ लाखांची फसवणूक; उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १३ लाखांची फसवणूक; उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

उदगीरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंट प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Oct 10, 2026
सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी मारून आत्महत्या 

सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी मारून आत्महत्या 

Young Farmer Suicide: तालुक्यातील वगरवाडी तांडा येथील तरुण शेतकरी आकाश पंढरीनाथ चव्हाण (२५) वर्षे याने सततची नापिकी व कुटुंबावरील कर्जबाजारी पणाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या

Oct 08, 2026
भंडार्‍यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणार्‍या शेतकर्‍याची आत्महत्या

भंडार्‍यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणार्‍या शेतकर्‍याची आत्महत्या

Bhandara Farmer Suicides: मोहाडी तालुक्यातील आंधळगावजवळील धोप येथे दुष्काळाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍याने विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

Oct 08, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026