ST Bus Accidental death: सटी बसने दिलेल्या धडकेत फाळेगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना मालेगाव येथील तामसी फाट्यावरील उड्डाणपुलावर घडली.
मालेगावच्या तामसी फाट्यावरील उड्डाणपुलावर अपघात
फळेगाव (ST Bus Accidental death) : एसटी बसने दिलेल्या धडकेत हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना मालेगाव येथील तामसी फाट्यावरील उड्डाणपुलावर गुरुवारी सायंकाळी घडली. संदीप माणिक टोंचर (रा. फाळेगाव, ता. हिंगोली) असे मृत तरुणाचे नाव असून, सुनील कौतिका टोंचर हा गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ४९ सीडब्ल्यू १७७८ क्रमांकाची एसटी बस अकोलाकडून परभणीकडे जात होती. मालेगावजवळील तामसी फाट्यावरील उड्डाणपुलावर बसची धडक बसल्याने संदीप माणिक टोंचर आणि सुनील कौतिका टोंचर हे दोघे जखमी झाले. गंभीर मार लागल्याने संदीप याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, सुनील याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. या (ST Bus Accidental death) घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.