Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मुंबई

Expiry Date Fraud

नवी मुंबईत एक्स्पायरी डेटचा काळाबाजार उघड; 75 लाखांचा खाद्यसाठा जप्त

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात खाद्यपदार्थांच्या एक्स्पायरी डेटमध्ये फेरफार करून त्यांची मुदत वाढवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


नवी मुंबईत एक्स्पायरी डेटचा काळाबाजार उघड 75 लाखांचा खाद्यसाठा जप्त

Expiry Date Fraud |

तुर्भे एमआयडीसीतील साधना इंटरप्रायजेसवर गुन्हे शाखेचा छापा; मसाले, चहा पावडरसह खाद्यपदार्थांचा समावेश, 12 जणांवर गुन्हा

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात खाद्यपदार्थांच्या एक्स्पायरी डेटमध्ये फेरफार करून त्यांची मुदत वाढवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने साधना इंटरप्रायजेस या कंपनीवर कारवाई करत परदेशात निर्यातीसाठी ठेवण्यात आलेला तब्बल 75 लाख 21 हजार रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने 12 जणांविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेला साधना इंटरप्रायजेसमध्ये भारतीय उत्पादनांवरील मूळ एक्स्पायरी डेट काढून त्यावर अधिक मुदतीची तारीख असलेले स्टिकर लावले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने 24 ऑगस्ट रोजी कंपनीच्या ठिकाणी छापा टाकला.

तपासणीदरम्यान कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर विविध खाद्यपदार्थ आढळून आले. यामध्ये अनेक प्रकारचे मसाले, चहा पावडर तसेच दैनंदिन वापरातील इतर खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा समावेश होता. या संपूर्ण साठ्याची किंमत 75 लाख 21 हजार रुपये असल्याचे समोर आले.

परदेशात निर्यातीपूर्वी एक्स्पायरी डेटमध्ये फेरफार

संबंधित कंपन्यांकडून हे खाद्यपदार्थ वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केले जात होते. मात्र, माल परदेशात पोहोचेपर्यंत त्याची मूळ मुदत संपण्याची शक्यता असल्याने एक्स्पायरी डेट बदलण्याचे काम साधना इंटरप्रायजेसमध्ये केले जात असल्याचा आरोप आहे. मूळ उत्पादकाने छापलेली तारीख हटवून त्याऐवजी वाढीव मुदत दर्शवणारे स्टिकर लावले जात असल्याचे तपासात समोर आले.

मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा आढळल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. FDAच्या पथकाने सलग पाच दिवस सखोल पंचनामा केला. त्यानंतर या प्रकरणात 12 जणांविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related to this topic: