Expired Biscuits

‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

ठाण्यात ५ रुपयांच्या मुदतबाह्य बिस्किटावरून वाद. राघव दुबे यांच्या तक्रारीनंतर FDA ने रामायण जनरल स्टोअरवर कारवाई करत दुकानाला टाळे ठोकले.

‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर  बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणाऱ्या दुकानदाराला दणका; डिजिटल कंटेन्ट क्रिएटर राघव दुबे यांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : ग्राहकांना मुदतबाह्य खाद्यपदार्थ विकणे दुकानदारांना महागात पडू शकते. ठाण्यातील एका जनरल स्टोअरमध्ये पाच रुपयांच्या बिस्किटावरून झालेल्या वादानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. मुदत संपलेले बिस्किट विकल्याचा आरोप आणि त्यानंतर दुकानदाराने ग्राहकाला दिलेल्या उद्धट प्रतिसादामुळे हा प्रकार चर्चेत आला आहे. संबंधित दुकानाविरोधात ऑनलाइन तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत दुकानाला टाळे ठोकले.

नेमके काय घडले?

ठाण्यातील ‘रामायण जनरल स्टोअर’मधून डिजिटल कंटेन्ट क्रिएटर राघव दुबे यांनी ‘क्रैकजॅक’ बिस्किटाचे पॅकेट खरेदी केले होते. मात्र, घरी पोहोचल्यानंतर पॅकेटवरील मुदत संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बिस्किट बदलून घेण्यासाठी आणि या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी पुन्हा दुकान गाठले.

मात्र, ग्राहकाच्या तक्रारीवर तोडगा काढण्याऐवजी दुकानदाराने उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी योग्य प्रतिसाद न मिळाल्यास तक्रार करण्याचा इशारा राघव दुबे यांनी दिला. त्यावर दुकानदाराने ‘जा, तुला जिथे तक्रार करायची तिथे कर’ अशा शब्दांत उत्तर दिले.

ऑनलाइन तक्रारीनंतर FDA ची कारवाई

दुकानदाराच्या या वर्तनानंतर राघव दुबे यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत FDA च्या पथकाने संबंधित दुकानात धडक देत तपासणी केली.

मुदतबाह्य बिस्किट विकल्याच्या प्रकरणानंतर प्रशासनाने ‘रामायण जनरल स्टोअर’विरोधात कारवाई केली आणि दुकानाला टाळे ठोकले. पाच रुपयांच्या बिस्किटावरून सुरू झालेला हा वाद आता दुकानदाराच्या कारवाईपर्यंत पोहोचला आहे.

ग्राहकांना खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकेटवरील उत्पादनाची आणि वापरण्याची अंतिम तारीख तपासण्याचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

संबंधित सामग्री

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; 'आधी चित्रपट पाहा, मग विरोध करा!'

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; 'आधी चित्रपट पाहा, मग विरोध करा!'

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद यांचा सवाल! 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डावरून नवा वाद.

Nov 17, 2026
धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

Maharashtra Dam Water Storage: धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली असून, राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 64.17 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 90.54 टक्के

Nov 16, 2026
बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

Bengal Cyclone Crisis: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाल

Nov 16, 2026
महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील ३ नामांकित हॉटेल्सचे FDA कडून अन्न विक्री परवाने निलंबित. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरूच!

Nov 16, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेल बंद! तपासणीत धक्कादायक प्रकार उघड

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेल बंद! तपासणीत धक्कादायक प्रकार उघड

पुण्यातील हॉटेल वैशाली आणि रूपालीवर FDA ची कारवाई! अस्वच्छतेमुळे परवाने निलंबित; पार्सल आणि होम डिलिव्हरी बंद.

Nov 14, 2026