Exam Stress

NEET परीक्षेतील अपयशाचा मानसिक धक्का; साताऱ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे गावात NEET परीक्षेतील अपयशामुळे मानसिक तणावात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

NEET परीक्षेतील अपयशाचा मानसिक धक्का; साताऱ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Exam Stress

कराड तालुक्यातील शेरे गावातील घटना; विषारी औषध प्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू, मसूर पोलिसांकडून तपास सुरू

 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे गावात NEET परीक्षेतील अपयशामुळे मानसिक तणावात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. समीक्षा दीपक पवार असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षा दीपक पवार हिने गेल्या वर्षी NEET परीक्षा दिली होती. मात्र, निकालात अपयश आल्यापासून ती मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करत होती. या अवस्थेतच तिने २३ जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्यांचे सेवन करून टोकाचे पाऊल उचलले.

घटना घडल्यानंतर सुरुवातीला तिने विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती घरातील कोणालाही दिली नव्हती. दोन दिवसांनंतर विषाचा परिणाम शरीरावर जाणवू लागला आणि तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

समीक्षाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर नातेवाईकांनी २६ जुलै रोजी तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून आई-वडिलांनी अक्षरशः टाहो फोडला. स्पर्धा परीक्षांमधील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढणाऱ्या मानसिक तणावाचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाची नोंद करून मसूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीत जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन; समान वेतनासाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

हिंगोलीत जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन; समान वेतनासाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

हिंगोलीत समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा, तर १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा.

Oct 16, 2026
रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात बनावट NA आदेश, 223 प्लॉट आणि झाडांच्या लागवडीचा दावा

रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात बनावट NA आदेश, 223 प्लॉट आणि झाडांच्या लागवडीचा दावा

रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात 223 प्लॉट आणि चंदन-आंब्याच्या लागवडीच्या नोंदींची चौकशी करण्याची मागणी.

Oct 16, 2026
मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे १० ते १५ टक्के दरवाढीचा विचार सुरू आहे.

Oct 15, 2026
पाकिस्तानमध्ये शाळेची इमारत ठरली जीवघेणी; २१ जणांचा मृत्यू, रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती

पाकिस्तानमध्ये शाळेची इमारत ठरली जीवघेणी; २१ जणांचा मृत्यू, रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये खासगी शाळेचे छत कोसळून २० विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू. जखमींवर उपचार सुरू; रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर.

Oct 15, 2026
दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दिवाळी २०२६ मध्ये एसटी भाडेवाढीला ब्रेक! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रस्तावित १५ टक्के हंगामी वाढ नामंजूर केली.

Oct 15, 2026