एकता सोसायटी भीषण आग

एकता हाऊसिंग सोसायटीत भीषण आग; नगरसेवक प्रीतम बोकडे यांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली!

Ekta Society Terrible fire: प्रधानमंत्री आवास योजना परिसरातील एकता हाऊसिंग सोसायटीमध्ये इलेक्ट्रिक डीपीजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण...

एकता हाऊसिंग सोसायटीत भीषण आग; नगरसेवक प्रीतम बोकडे यांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली!

Ekta Society Terrible fire

तरोडी खुर्द (Ekta Society Terrible fire) : प्रधानमंत्री आवास योजना परिसरातील एकता हाऊसिंग सोसायटीमध्ये इलेक्ट्रिक डीपीजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, (Ekta Society Terrible fire) घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक प्रीतम बोकडे (Corporator Pritam Bokade) यांनी तातडीने दखल घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

इलेक्ट्रिक डीपीजवळ अचानक आग

एकता हाऊसिंग सोसायटी, प्रधानमंत्री आवास योजना, खसरा क्रमांक 63, तरोडी खुर्द येथे योगा सेंटरच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक डीपीजवळ ही घटना घडली. अचानक आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत नगरसेवक प्रीतम बोकडे (Corporator Pritam Bokade) यांना घटनेची माहिती दिली.

अग्निशमन दलाची तातडीने मदत

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक प्रीतम बोकडे (Corporator Pritam Bokade) यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी बोलावले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. वेळेवर अग्निशमन दलाची मदत उपलब्ध झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नागरिकांकडून नगरसेवकांचे आभार

या (Ekta Society Terrible fire) घटनेच्या वेळी अजय ठाकरे, प्रमोद ठवली, पांडुरंग मुळे यांच्यासह सोसायटीतील नागरिक उपस्थित होते. संकटाच्या वेळी तत्परतेने दखल घेऊन अग्निशमन दलाची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल सोसायटीतील नागरिकांनी नगरसेवक प्रीतम बोकडे यांचे आभार मानले. नागरिकांची सुरक्षितता, त्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेणे आणि संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेणे, हे लोकप्रतिनिधींच्या जनसेवेतील महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.