Drought

दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा!

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करण्याची मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा!

Drought

माजी आमदार धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात धीरज देशमुख यांनी नमूद केले आहे की, अपुरा व अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि जमिनीत ओलावा न राहिल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, उभ्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या बिकट परिस्थितीत ग्रामीण भागातील जनजीवन वाचवण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर ठोस उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने बाधित जिल्ह्यांमध्ये तातडीने जिल्हा व तालुकास्तरावर पीक नुकसानीचे पंचनामे करून आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे (DBT) नुकसानभरपाई जमा करावी, शेती कर्जांचे पुनर्गठन करून व्याज माफ करावे आणि संकटकाळात सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पावसावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्यासह पशुधनाच्या संरक्षणासाठी चारा छावण्या व चारा बँक तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तात्काळ आर्थिक मदत, पीक संरक्षण आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सांगड घालून सरकारने बळीराजाला तातडीने आधार द्यावा, असा पुनरुच्चार धीरज देशमुख यांनी केला आहे.

संबंधित सामग्री

जिल्हा बँकेसाठी 48 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल!

जिल्हा बँकेसाठी 48 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल!

Latur District Central Cooperative Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 48 जण..

Oct 15, 2026
माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीत कथित गैरप्रकाराचा सुषमा अंधारेंचा आरोप. नागपूरच्या एका केंद्रावरील २४ उमेदवार मेरिटमध्ये; चौकशी आणि फेरपरीक्षेची मागणी.

Oct 15, 2026
सहर शेखचे वडील युनुस शेख यांची शिंदे सेनेत नियुक्ती? कळवा-मुंब्रा केबल सेनेचे अध्यक्षपद मिळाल्याने ठाण्यात राजकीय चर्चा

सहर शेखचे वडील युनुस शेख यांची शिंदे सेनेत नियुक्ती? कळवा-मुंब्रा केबल सेनेचे अध्यक्षपद मिळाल्याने ठाण्यात राजकीय चर्चा

सहर शेखचे वडील युनुस शेख यांना कळवा-मुंब्रा केबल सेनेचे अध्यक्षपद मिळाल्याने ठाण्यात चर्चा सुरू. मात्र, शिंदे सेनेत प्रवेश केल्याचे वृत्त त्यांनी नाकारले.

Oct 15, 2026
मुलांना पिझ्झा देण्यापूर्वी ही बातमी वाचा! डॉमिनोजच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळं! पुण्यातील वारजे आउटलेटवर मोठी कारवाई

मुलांना पिझ्झा देण्यापूर्वी ही बातमी वाचा! डॉमिनोजच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळं! पुण्यातील वारजे आउटलेटवर मोठी कारवाई

पुण्यात डॉमिनोजच्या वारजे आउटलेटमध्ये जिवंत झुरळं आढळल्याने FDA ने अन्न परवाना निलंबित केला. अन्य दोन आउटलेट्समध्येही गंभीर त्रुटी आढळल्या.

Oct 15, 2026
मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे १० ते १५ टक्के दरवाढीचा विचार सुरू आहे.

Oct 15, 2026