लातूर दुष्काळी परिस्थिती

हार्वेस्टरने ऊस तोडणीतून एकरी ४०० वाढ्याच्या पेंढ्या!

Latur Drought situation: दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची तीव्र टंचाई असताना रेणा साखर कारखान्याच्या वतीने मुशिराबाद येथील शेतकऱ्यांच्या शेतात राबविण्यात आलेल्या आधुनिक यंत्रणेमुळे जनावरांच्या चारा...

हार्वेस्टरने ऊस तोडणीतून एकरी ४०० वाढ्याच्या पेंढ्या!

Latur Drought situation

 

दुष्काळात पशुधनाच्या चाऱ्याची झाली सोय

लातूर (Latur Drought situation) : दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची तीव्र टंचाई असताना रेणा साखर कारखान्याच्या वतीने मुशिराबाद येथील शेतकऱ्यांच्या शेतात राबविण्यात आलेल्या आधुनिक यंत्रणेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. हार्वेस्टरद्वारे होत असलेल्या ऊस तोडणीत 'टॉपर' यंत्राच्या सहाय्याने उसाचे वाढे वाया न जाता सुरक्षितपणे बाजूला निघत असून, यामुळे एका एकरामध्ये तब्बल ४०० वाढ्याच्या पेंढ्या मिळत आहेत. या दिलासादायक उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री तथा लातूर शहराचे आमदार अमितभैय्या देशमुख आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरजभैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणा सहकारी साखर कारखाना, दिलीपनगरच्या वतीने ही आधुनिक हार्वेस्टर यंत्रणा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी कारखाना पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकतीच मुशिराबाद येथील शेतकरी श्री. आरदवाड निवृत्ती नामदेव यांच्या शेतात करण्यात आली.

मुशिराबाद येथील शेतकरी निवृत्ती आरदवाड,  जीवन मलवाडे आणि  विश्वनाथ कोरे यांच्या शेतामध्ये रेणा साखर कारखान्याच्या माध्यमातून हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्यात आली. त्यानंतर या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातून एकरी तब्बल ४०० पेंढ्यांच्या आसपास वाढे व्यवस्थित जमा केले आहेत. दुष्काळामध्ये जनावरांच्या चाऱ्याची मोठी चिंता मिटल्याचे समाधान यावेळी या शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून सध्याच्या परिस्थितीत हार्वेस्टर हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे मत शेतकरी जीवन मलवाडे यांनी व्यक्त केले.
या पाहणी दौऱ्यावेळी रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. प्रवीण पाटील, संचालक  शंकर पाटील,  रणजित पाटील, तज्ञ संचालक  नरसिंग इंगळे यांच्यासह शेतकरी श्री. जीवन मलवाडे,  रामेश्वर मलवाडे, . परमेश्वर बेडदे, . गिरीष मलवाडे, विश्वनाथ कोरे तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव व कारखाना कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गातून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

तीन-चार महिने चाऱ्याची सोय!
याविषयी माहिती देताना रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. प्रवीण पाटील म्हणाले की, पारंपारिक पद्धतीने ऊस तोडणी करताना चारा अनेकदा नष्ट होतो किंवा मातीत मिसळतो. परंतु, हार्वेस्टरवरील 'टॉपर' यंत्रामुळे उसाचे वाढे उत्तम दर्जाचे आणि व्यवस्थित बाजूला निघतात. यामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी पुढील ३ ते ४ महिन्यांच्या चाऱ्याची भक्कम सोय उपलब्ध झाली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.