पातूर (Patur Drought Relief) : राज्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्र झळ पोहोचत असताना, समाजोपयोगी उपक्रमांतर्गत पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते रितेश फुलारी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
पातूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरंडी, वसली आणि पांगरताटी या गावांमध्ये या मोफत पाणीपुरवठ्याचा शुभारंभ करण्यात आला. या पाणीपुरवठा टँकरचे अधिकृत उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या शुभहस्ते पार पडले. दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
या (Patur Drought Relief) उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीची समस्त तालुका कार्यकारिणी, पंचायत समितीचे ज्येष्ठ नेते, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत सुरू केलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.
पातूर दुष्काळ दिलासा
दुष्काळात दिलासा: पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वंचिततर्फे मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू
Patur Drought Relief: राज्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्र झळ पोहोचत असताना, समाजोपयोगी उपक्रमांतर्गत पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे...
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Patur Drought Relief
टैग्स:
Drought Relief for Patur