मानोरा येथे कोरडा दुष्काळ

आज मानोरा येथे कोरडा दुष्काळासाठी जन आक्रोश आंदोलन मोर्चा

Manora Dry Drought: मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने भव्य शेतकरी शेतमजूर  जनआक्रोश महामोर्चा

आज मानोरा येथे कोरडा दुष्काळासाठी जन आक्रोश आंदोलन मोर्चा

Manora Dry Drought

मानोरा (Manora Dry Drought) : मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने भव्य शेतकरी शेतमजूर  जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन मानोरा शहरात आज आठवडी बाजाराच्या दिवशी बुधवार दि. १६  सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील इंगोले यांनी केले आहे.

हा जनआक्रोश मोर्चा माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मान्यवर व प्रतिष्ठित शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती पासून ते तहसिल कार्यालयापर्यंत निघणार आहे. मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा, सन २०२५-२०२६ मधील पीक विमा ताबडतोब देण्यात यावा,  सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी द्या आदीसह इतर विविध मागण्यांसंदर्भात महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी देशाला नवीन दिशा व मार्गदर्शन देऊन न्याय मिळवून देणारे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब व कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष युवा नेता अभिजीत दिपके यांच्या फोटोचा दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी, शेत मजूर, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील व महाविकास आघाडी तालुका मानोराच्या वतीने करण्यात आले आहे.

टैग्स: Manora Dry Drought

संबंधित सामग्री

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

Manora Dry Drought: तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, सरसगट कर्जमाफी करण्यात यावी,पिक विमा ताबडतोब देण्यात यावा आदी मागण्यासाठी मानोरा

Sep 16, 2026