Drone Accident Mumbai

चर्चगेट स्थानकात आकाशातून ड्रोन कोसळले; प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत

वानखेडे स्टेडियममधील ड्रोन शोचे ड्रोन चर्चगेट रेल्वे स्थानकात कोसळले. डोक्याला दुखापत झाल्याने 37 वर्षीय प्रवासी जखमी; पोलिसांकडून तपास सुरू.

चर्चगेट स्थानकात आकाशातून ड्रोन कोसळले; प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत

Drone Accident Mumbai

प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर रात्री 8.10 वाजता दुर्घटना; हेमंत प्रकाश महोत्सवकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, रेल्वे पोलिसांकडून दोन्ही ड्रोन जप्त

मुंबई : वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोदरम्यान नियंत्रण सुटलेल्या ड्रोनमुळे चर्चगेट रेल्वे स्थानकात मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. 28 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 8.10 वाजता विरारच्या दिशेने जाणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर अचानक एक ड्रोन येऊन कोसळले. यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या डोक्याला ड्रोनचा जोरदार धक्का लागला. या घटनेत हेमंत प्रकाश महोत्सवकर (37) हे जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमीप्रमाणे लोकलची प्रतीक्षा करत होते. त्याचवेळी अचानक आकाशातून आलेले ड्रोन थेट हेमंत महोत्सवकर यांच्या डोक्यावर आदळले. या धडकेत त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच एएसआय शंकरलाल मीणा, हेड कॉन्स्टेबल गौरव परमार आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे आकाश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशाला सुरुवातीला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली.

जखमी प्रवाशाला जीटी रुग्णालयात हलवले

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक उपचारानंतर हेमंत महोत्सवकर यांनी सुरुवातीला घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी लेखी जबाबही नोंदवला. मात्र, सुमारे 15 मिनिटांनंतर त्यांना आणखी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून जीटी रुग्णालयात हलवण्यात आले.

चर्चगेट जीआरपीकडून दोन्ही ड्रोन जप्त

या घटनेनंतर चर्चगेट जीआरपीने घटनास्थळी कोसळलेली दोन्ही ड्रोन ताब्यात घेतली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ही ड्रोन वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोचा भाग असल्याचे समोर आले आहे. ड्रोनचे नियंत्रण सुटल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने ती चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेने आली असावीत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, वानखेडे स्टेडियमपासून चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत ही ड्रोन नेमकी कशी पोहोचली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमागे आयोजकांचे दुर्लक्ष होते का, ड्रोन उड्डाणादरम्यान तांत्रिक समस्या निर्माण झाली होती का किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का, या सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. तपासातून या दुर्घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

Maharashtra Dam Water Storage: धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली असून, राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 64.17 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 90.54 टक्के

Nov 16, 2026
बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

Bengal Cyclone Crisis: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाल

Nov 16, 2026
महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील ३ नामांकित हॉटेल्सचे FDA कडून अन्न विक्री परवाने निलंबित. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरूच!

Nov 16, 2026
दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

National Sports Awards: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

Nov 13, 2026
अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार? चेअरमन राजेश पाटील यांचे संकेत; शनिवारी नव्या दरांबाबत निर्णय होण्याची शक्यता.

Nov 13, 2026