Dr. Sureshkant Rathi: विदर्भ विकास बहुउद्देशीय संस्था, मानोराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेशकांत राठी यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील लोकहित प्राथ व माध्य मराठी शाळेत..
Dr. Sureshkant Rathi |
मानोरा (Dr. Sureshkant Rathi) : विदर्भ विकास बहुउद्देशीय संस्था, मानोराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेशकांत राठी यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील लोकहित प्राथ व माध्य मराठी शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव गोपाल लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदाच्या साक्षीने केक कापून डॉ. राठी (Dr. Sureshkant Rathi) यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येऊन वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवा, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी डॉ राठी यांनी मनमोकळे पणाने वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करून मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांच्याशी संवाद साधला.

यावेळी लोकहित प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. मनवर, लोकहित मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तौकीफ शेख, चिंतामणी प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक विजय राठोड, शिक्षक रविंद्र दराळे, गौरव चव्हाण, आशिष भगत, गजानन इंगोले, एम. डी. डहाके, अविनाश सावके, कु. रुक्मिणा नवघरे, कु. राजश्री जामनिक, कु. श्वेता ठाकरे, राणी घाटगे, सुरेखा चव्हाण, सतीश येडतकर यांच्यासह लोकहित प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा, चिंतामणी पूर्व प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.