हिंगोली (Dr. Prakash Ambhore) : शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा हिंगोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सखाराम अंभोरे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रस्तरीय भारत गौरव श्री पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी कामोठे, नवी मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. बाळाराम पाटील यांच्या हस्ते डॉ. अंभोरे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. रत्नाकर संपत अहिरे, प्रमुख पाहुणे तथा अभिनेते श्री. सतीश देशमुख, ज्येष्ठ सिनेअभिनेत्री श्रीमती आशा गोपाल ज्ञाते आणि कलासाधना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा संचालिका सौ. मेघा श्रीराम महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका सौ. अनघा संजय जाधव यांनी केले.
डॉ. अंभोरे (Dr. Prakash Ambhore) यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, शिक्षकांचे सक्षमीकरण, विद्यार्थी विकास, सामाजिक प्रबोधन आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी व शिक्षकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे कार्य समाजात नवचैतन्य निर्माण करणारे आणि राष्ट्राच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायी असल्याचे संस्थेने सन्मानपत्रात नमूद केले आहे.
कलासाधना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा महाजन यांनी डॉ. अंभोरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करीत त्यांच्या भावी समाजोपयोगी आणि राष्ट्रहितकारी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी कृषी अधिकारी चंद्रकांत कल्याणकर यांची उपस्थिती होती.
या राष्ट्रस्तरीय सन्मानाबद्दल भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. मदन मार्डीकर, सचिव ॲड. गयबाराव नाईक, संचालक ॲड. केशवराव शिरसाट व श्री. पंडितराव बांगर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. अनिल लोळेवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक तसेच हिंगोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. विठ्ठल सोळंके, संघाचे सर्व पदाधिकारी, डॉ. गणेश अंभोरे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. प्रकाश अंभोरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. प्रकाश अंभोरे
डॉ. प्रकाश अंभोरे ‘राष्ट्र स्तरीय भारत गौरव श्री पुरस्कार–२०२६’ ने सन्मानित
Dr. Prakash Ambhore: भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा हिंगोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सखाराम अंभोरे
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Dr. Prakash Ambhore
टैग्स:
Dr Prakash Ambhore