Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डीजे मुक्त गणेश विसर्जन

मिरवणुका डीजे मुक्त करा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन करा: पोलीस उपाधीक्षक उपाध्यक्ष मयूर रसाळ

DJ Mukta Ganesha immersion: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा १०९ गणपतींची, तर कळमनुरी शहरात २७ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील २० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’


मिरवणुका डीजे मुक्त करा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन करा पोलीस उपाधीक्षक उपाध्यक्ष मयूर रसाळ

DJ Mukta Ganesha immersion |

कळमनुरी (DJ Mukta Ganesha immersion) : कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा १०९ गणपतींची, तर कळमनुरी शहरात २७ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील २० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ यांनी केले आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता मंडळांनी घ्यावी

शांतता व सलोखा अबाधित ठेवण्याचे सर्वांनी प्रयत्न करावे
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्व समाजातील नागरिकांनी शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ यांनी केले. गणेश मंडळांनी मिरवणुकीचे नियोजन करताना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि गणेश विसर्जन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘भक्तीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करूया, डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देऊया,’ असा संदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.