Diya Mirza Video

अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने हटवला दिया मिर्झाचा व्हिडीओ; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली...

अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने हटवला दिया मिर्झाचा दिवाळी मोहिमेतील व्हिडीओ; अभिनेत्रीची सोशल मीडियावर प्रतिक्रिया.<br/><br/>

 अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने हटवला दिया मिर्झाचा व्हिडीओ; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली...

Diya Mirza Video

पर्यावरणपूरक दिवाळीच्या जनजागृती मोहिमेवरून राजकीय वाद; 'दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे देण्याची गरज नाही', अमित साटम यांची टीका

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन करणारी मुंबई महानगरपालिकेची सेलिब्रिटी जनजागृती मोहीम आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्री दिया मिर्झा हिचा या मोहिमेतील व्हिडीओ महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिया मिर्झाच्या सहभागावर आक्षेप घेतल्यानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणावर दिया मिर्झानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

अमित साटम यांचा दिया मिर्झाच्या व्हिडीओला आक्षेप

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आगामी दिवाळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी विशेष जनजागृती अभियान सुरू केले आहे. या मोहिमेतून नागरिकांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यासाठी क्रिकेटपटू आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मदत घेण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत अनेक प्रसिद्ध कलाकारांचे व्हिडीओ महापालिकेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये अभिनेत्री दिया मिर्झाचाही समावेश होता. मात्र, तिच्या व्हिडीओवरून मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप नोंदवला.

साटम यांनी मुंबई महापालिकेला टॅग करत सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये दिवाळीचे महत्त्व खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी, याबाबत दिया मिर्झाकडून मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या भूमिकेनंतर या मोहिमेवरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिया मिर्झाचा व्हिडीओच महापालिकेच्या अकाउंटवरून गायब

अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच मोहिमेतील इतर सेलिब्रिटींचे व्हिडीओ मात्र अद्याप उपलब्ध आहेत.

या अभियानात माधुरी दीक्षित, महेश कोठारे, शिव ठाकरे आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या कलाकारांनीही सहभाग घेतला होता. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कायम असताना केवळ दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या कारणामुळे काढण्यात आला, याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, अमित साटम यांनी घेतलेल्या आक्षेपानंतरच ही कारवाई झाल्याची चर्चा सुरू आहे.

'आता तर चांगुलपणाचा जमनाच राहिला नाही'; दिया मिर्झाची प्रतिक्रिया

आपला व्हिडीओ महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आल्यानंतर दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपण कोणतेही मानधन किंवा पैसे घेतले नसल्याचे तिने स्पष्ट केले.

'कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. आता तर चांगुलपणाचा जमनाच राहिला नाही,' अशा शब्दांत तिने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. तिच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

एकीकडे मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचा उद्देश पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देणे हा आहे, तर दुसरीकडे याच मोहिमेतील एका कलाकाराच्या व्हिडीओवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता या प्रकरणावर मुंबई महापालिका काय स्पष्टीकरण देते, याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

Aditya Thackeray: राहुल गांधी यांनी केलेला फोन टॅपिंगचा आरोप खरा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Nov 15, 2026
'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

डिलिमिटेशनवर चंद्रशेखर बावनकुळेंचे समर्थन, काँग्रेसवर निशाणा! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही एनडीएच्या भूमिकेचे सूचक संकेत.

Nov 14, 2026
मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? ५०० कोटींच्या क्लिपनंतर फडणवीस-शिंदेंबाबत मोठे संकेत; SIT चौकशीची मागणी.

Nov 14, 2026
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा! काही गोष्टी जवळपास ठरल्याचे सांगत संभाव्य निर्णयाला विरोध.

Nov 14, 2026
अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या विमान अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवार १६ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार?

Nov 14, 2026