Diwali Bonus Scam

मोफत ८ हजार रुपयांच्या आमिषाला बळी पडू नका! WhatsApp वर फिरतोय बनावट मेसेज

WhatsApp वर ८ हजारांच्या दिवाळी बोनसचा मेसेज व्हायरल! PIB ने दावा फेटाळला; एका लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध व्हा.

मोफत ८ हजार रुपयांच्या आमिषाला बळी पडू नका! WhatsApp वर फिरतोय बनावट मेसेज

पंतप्रधानांच्या नावाने आर्थिक मदतीचा बनावट दावा; PIB च्या पडताळणीत मेसेज फेक असल्याचे स्पष्ट, नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत असतानाच सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा डाव आखला आहे. व्हॉट्सॲपवर सध्या दिवाळीनिमित्त प्रत्येक नागरिकाला ८ हजार रुपये बोनस मिळणार असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधानांच्या नावाचा वापर करून नागरिकांना आर्थिक मदतीचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, या मेसेजमागे सायबर फसवणुकीचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

व्हायरल मेसेजमध्ये केंद्र सरकारकडून दिवाळी भेट म्हणून प्रत्येकाला ८ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी मेसेजसोबत एक लिंकही पाठवली जात आहे. संबंधित लिंक उघडून त्यामध्ये वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील भरण्याचे आवाहन केले जात आहे.

मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अशा कोणत्याही दिवाळी बोनसची किंवा ८ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे केवळ पैशांच्या आमिषापोटी अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.

नेमकी कशी केली जाते फसवणूक?

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना मोफत पैसे किंवा सरकारी आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगून जाळ्यात ओढले जाते. यासाठी व्हॉट्सॲपवर आकर्षक संदेश पाठवून त्यासोबत संशयास्पद लिंक जोडली जाते.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर सरकारी योजनेसारखी दिसणारी बनावट वेबसाइट उघडू शकते. त्यामध्ये नागरिकांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याशी संबंधित माहिती मागितली जाते. काही प्रकरणांमध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली ओटीपी आणि यूपीआय पिनदेखील विचारला जातो.

नागरिकांनी ही माहिती दिल्यास सायबर गुन्हेगारांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळू शकते. परिणामी, बँक खात्यातील पैसे परस्पर काढले जाण्याचा धोका निर्माण होतो.

८ हजारांच्या आमिषाला बळी पडू नका!

दिवाळी बोनसच्या नावाखाली पाठवण्यात येणाऱ्या अशा संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची अधिकृत स्रोतांकडून खातरजमा करणे आवश्यक आहे. सरकारच्या नावाने आलेला प्रत्येक संदेश खरा असेलच असे नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळावे.

तसेच कोणत्याही परिस्थितीत बँक खात्याचा तपशील, ओटीपी किंवा यूपीआय पिन इतरांना देऊ नये. संशयास्पद वेबसाइटवर वैयक्तिक माहिती भरू नये. ८ हजार रुपयांच्या बोनसच्या आमिषापोटी स्वतःच्या कष्टाची कमाई धोक्यात घालू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

सायबर गुन्हेगारांच्या नवीन फंड्यांपासून सावधान!; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांचे नागरिकांना आवाहन

सायबर गुन्हेगारांच्या नवीन फंड्यांपासून सावधान!; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांचे नागरिकांना आवाहन

हिंगोलीत सायबर फसवणुकीबाबत पोलिसांचे आवाहन. OTP, QR Code, Digital Arrest आणि KYC Fraud पासून सावध राहा. फसवणूक झाल्यास 1930 वर संपर्क साधा.

Oct 14, 2026
पंतप्रधान मोदींकडून IMC 2026 चे उद्घाटन; 5G, 6G, AIसह भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक

पंतप्रधान मोदींकडून IMC 2026 चे उद्घाटन; 5G, 6G, AIसह भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक

India Mobile Congress 2026 चे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. 5G, 6G, AI, IoT, सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्ससह नव्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन यशोभूमीत होत आहे.

Oct 08, 2026
आधार कार्डवर ₹3 लाख कर्ज देण्याची योजना? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य PIB Fact Check ने सांगितलं

आधार कार्डवर ₹3 लाख कर्ज देण्याची योजना? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य PIB Fact Check ने सांगितलं

सोशल मीडियावर सध्या आधार कार्डच्या आधारे प्रत्येक नागरिकाला ₹3 लाखांचे कर्ज मिळणार असल्याचा दावा करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात फिरत आहे.

Aug 28, 2026
भारतावर सायबर हल्ल्यांचे सावट; AI मुळे धोका अधिक गंभीर

भारतावर सायबर हल्ल्यांचे सावट; AI मुळे धोका अधिक गंभीर

India Cyber ​​Attack: AI च्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आणि गंभीर आव्हान उभे राहिले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक सायबर हल्ल्यांना सामोरा जाणाऱ्या देशांपैकी एक

Aug 25, 2026
‘ऑपरेशन सिंदूर’ सायबर हल्ला तपासाचा जुन्नरपर्यंत तपास; NIAकडून दोघे ताब्यात, मनी ट्रान्सफर व्यवहारांची चौकशी

‘ऑपरेशन सिंदूर’ सायबर हल्ला तपासाचा जुन्नरपर्यंत तपास; NIAकडून दोघे ताब्यात, मनी ट्रान्सफर व्यवहारांची चौकशी

‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती पुणे जिल्ह्यातील जुन्नरपर्यंत पोहोचली आहे.

Aug 25, 2026