Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

ढोणी दारूबंदी एल्गार

ढोणी येथील महिला पुरुषांचा दारूबंदीसाठी एल्गार!

Dhoni Liquor Ban: मानोरा तालुक्यातील ढोणी  येथे गेल्या बऱ्याच वर्षापासून अवैध धंदे जोरात चालू आहेत   हे अवैध धंदे बंद करावे, यासाठी महिला पुरुष मंडळींनी आसेगाव पोलीस स्टेशनला  धडक निवेदन


ढोणी येथील महिला पुरुषांचा दारूबंदीसाठी एल्गार 

Dhoni Liquor Ban |

मानोरा (Dhoni Liquor Ban) : तालुक्यातील ढोणी  येथे गेल्या बऱ्याच वर्षापासून अवैध धंदे जोरात चालू आहेत   हे अवैध धंदे बंद करावे, यासाठी महिला पुरुष मंडळींनी आसेगाव पो. स्टे.ला  धडक देत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण भाकडे यांना लेखी निवेदन सादर केले आहे. 

सविस्तर असे की, ढोणी येथे गेल्या कित्येक वर्षापासून अवैध धंदे चालू असल्यामुळे येथील सुव्यवस्था कोलमडली असून या (Dhoni Liquor Ban) अवैध धंद्याचा परिणाम नवीन पिढीवर दिवसेंदिवस होत आहे. बरेचसे काही कुटुंब या (Dhoni Liquor Ban) अवैध धंद्यामुळे उध्वस्त सुद्धा झाले आहे, याचा परिणाम शाळकरी मुलावर सुद्धा होत असल्याचे दिसून येत आहे, यापुढे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये या उद्देशाने येथील महिलांनी सभा घेऊन या सभेत दारूबंदी व इतर अवैध धंदे बंद करणे विषयी ठराव घेतला असुन आता गावात अवैध धंदे चालू देणार नाही आणि कुटुंब उध्वस्त होऊ देणार नाही. असा चंग बांधला आहे.  

यासाठी आम्हाला पोलिसांनीही सहकार्य करावे, या मागणीसाठी आसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस  उपनिरीक्षक रामकृष्ण भाकडे यांना निवेदन देऊन सविस्तरपणे त्यांच्यासोबत (Dhoni Liquor Ban) अवैध धंद्या विषयी चर्चा सुद्धा केली. यावेळी पीएसआय भाकडे यांनी सुद्धा जो कोणी अवैध धंदे चालवेल, गावठी हातभट्टी काढेल, अशी त्याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी, आम्ही नक्कीच त्याचा बंदोबस्त व त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन व इतर माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

निवेदनावर राजेश व्यवहारे (पो.पा.), परसराम ढंगारे, गजानन नाटकर, गजानन शेळके, अरविंद ठाकरे, जिनकर चरखे, रेणुका ढगे, अनिता व्यवहारे, वंदना चिरंगे,  शारदाबाई तडसे, भाग्यश्री ठाकरे, मिराबाई नाटकर, लक्ष्मीबाई वाघमारे, अर्चना गिराटकर, व इतर महिला पुरुषांच्या शेकडो स्वाक्षऱ्या आहेत.