Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मुंबई

DeathRumour

मृत्यूची खोटी बातमी पाहून सिद्धार्थ जाधव संतापला; म्हणाला, “मी ठणठणीत बरा आहे”

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


मृत्यूची खोटी बातमी पाहून सिद्धार्थ जाधव संतापला म्हणाला “मी ठणठणीत बरा आहे”

सोशल मीडियावर अभिनेत्याच्या गंभीर आजाराची आणि मृत्यूशी झुंज देत असल्याची अफवा; व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्टीकरण

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या मृत्यूची बातमी मोबाईलवर पाहिल्यानंतर सिद्धार्थ जाधवने संताप व्यक्त केला असून, थेट व्हिडीओ शेअर करत ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सिद्धार्थ जाधवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने मोबाईलवर दाखवली जात असलेली स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी चाहत्यांसमोर मांडली. एका युट्यूब चॅनेलवर “अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार” अशा आशयाची बातमी प्रसारित केली जात असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं.

ही बातमी पाहून सिद्धार्थ जाधवने आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याने आपण पूर्णपणे ठणठणीत असून आपल्या कामात व्यस्त असल्याचं स्पष्ट केलं. त्याच्या या स्पष्टीकरणानंतर चाहत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला असून सोशल मीडियावर या अफवेविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘मी ठणठणीत बरा आहे’, सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण

स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टमधून सिद्धार्थ जाधवने आपल्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती दिली. तो सध्या ‘ॲनिमल’ या नाटकाचे प्रयोग करत असून ‘धिंगाणा’च्या शूटिंगमध्येही व्यस्त असल्याचं त्याने सांगितलं.

आपल्या प्रकृतीची चिंता करून फोन आणि मेसेज करणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले. त्याचवेळी कोणतीही बातमी देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडून माहितीची खातरजमा करण्याची गरज असल्याचं त्याने उपरोधिक शैलीत अधोरेखित केलं.

सिद्धार्थ जाधवने या संपूर्ण प्रकारावर विनोदी अंदाजात भाष्य करत, संबंधित बातमीमुळे निदान त्याच्या नाटकाचं प्रमोशन तरी होत असल्याचं म्हटलं. तसेच ‘Man is a more dangerous Animal than an ANIMAL’ असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केला.

२६ ऑगस्टला ‘ॲनिमल’चा प्रयोग

सिद्धार्थ जाधव सध्या ‘ॲनिमल’ या नाटकामुळे चर्चेत आहे. त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून २६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजी मंदिर, दादर येथे नाटकाचा प्रयोग असल्याची माहितीही दिली आहे.

दरम्यान, सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्याच्या चाहत्यांनीही मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीसोबत बॉलिवूडमध्येही गाजवलं नाव

सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजन क्षेत्रासोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनोदी भूमिका आणि दमदार अभिनयासाठी तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

आता तो लवकरच ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो २९ ऑगस्टपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.