परभणी विवाहिता मृत्यू

परभणीत शॉक लागल्याने 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू

Parbhani married woman Death: अंघोळीसाठी पाणी घेतांना पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या हिटरचा शॉक लागल्याने २२ वर्षीय तरुण विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना

परभणीत शॉक लागल्याने 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू

Parbhani married woman Death

 

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील बनवाडी येथील घटना

परभणी/ गंगाखेड (Parbhani married woman Death) : अंघोळीसाठी पाणी घेतांना पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या हिटरचा शॉक लागल्याने २२ वर्षीय तरुण विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सोनपेठ तालुक्यातील बनवाडी येथे घडली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनवाडी ता. सोनपेठ येथील कल्पना विकास नरवटे वय २२ वर्ष या शनिवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी अंघोळीसाठी फायबरच्या टाकीतून पाणी घेत असतांना टाकीत लावलेल्या हिटरचा शॉक (Parbhani married woman Death) लागल्याने त्यांनी जोरात ओरडल्याचा आवाज आल्याने पती विकास नरवटे यांनी जाऊन पाहिले असता कल्पना नरवटे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या तेंव्हा विकास नामदेव नरवटे यांनी सुधाकर नरवटे, जनार्धन नरवटे, गोविंद नरवटे यांच्या मदतीने चार चाकी वाहनातून बेशुद्ध अवस्थेतील कल्पना नरवटे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ निलंगेकर, परिचारिका अश्विनी मुंढे, शितल पांचाळ, गोविंद वडजे आदींनी छाती, पोट, पाठ, एक पाय व दोन्ही हात गंभीररित्या भाजलेल्या कल्पना नरवटे यांना तपासून मयत घोषित केले.

या (Parbhani married woman Death) प्रकरणी विकास नामदेव नरवटे वय २६ वर्ष रा. बनवाडी ता. सोनपेठ यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास पोह संदीप जाधव हे करीत आहेत. अंघोळीसाठी पाणी घेतांना हिटरचा शॉक लागून चार महिन्याची गर्भवती असलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.