Dapura Budruk

दापुरा बु. येथे ग्राम रोजगार सेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पदमुक्त करण्याची मागणी

दापुरा बु. येथे ग्राम रोजगार सेवक गोपाळ पवार यांच्याविरोधात ग्रामस्थांची तक्रार; मनरेगा व घरकुल लाभार्थ्यांच्या नुकसानाचा आरोप, पदमुक्त करण्याची मागणी.

दापुरा बु. येथे ग्राम रोजगार सेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पदमुक्त करण्याची मागणी

ग्राम रोजगार सेवक गोपाळ भगवान पवार यांच्याविरोधात गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्याकडे तक्रार; मनरेगा व घरकुल लाभार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

मानोरा : तालुक्यातील दापुरा बु. येथील ग्राम रोजगार सेवक गोपाळ भगवान पवार यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लाभार्थ्यांशी उद्धट वर्तन करणे, घरकुल आणि सिंचन विहिरींचे मस्टर काढण्यास टाळाटाळ करणे तसेच कामांसाठी पैशांची मागणी करणे, असे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. याप्रकरणी समस्त ग्रामस्थ आणि मनरेगा व जिराम जी योजनेच्या लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून ग्राम रोजगार सेवकाला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, गोपाळ भगवान पवार हे लाभार्थ्यांशी वारंवार उद्धटपणे बोलतात आणि अरेरावीची भाषा वापरतात. घरकुल तसेच सिंचन विहिरींचे मस्टर काढण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करून कामे वेळेत पूर्ण होण्यास विलंब लावला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कोणतेही कायदेशीर किंवा अधिकृत कारण न देता लाभार्थ्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कामांसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप

ग्राम रोजगार सेवक हेतुपुरस्सर कामकाज करत असून, लाभार्थ्यांना कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अशा प्रकारामुळे कर्तव्यात कसूर होत असून, मनरेगा आणि घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

घरकुलांच्या कामांची माहिती आणि जिओ टॅगिंगचा मुद्दा

पंचायत समितीअंतर्गत येणारे अभियंते तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गावात पाहणीसाठी येणाऱ्या अभियंत्यांना घरकुलांच्या सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती कळविण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकाची असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. मात्र, संबंधित कामांची माहिती जाणीवपूर्वक दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, लाभार्थ्यांच्या कामांचे जिओ टॅगिंग वेळेत न झाल्याने त्यांना आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या सर्व बाबींची दखल घेऊन ग्राम रोजगार सेवक गोपाळ भगवान पवार यांना पदमुक्त करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्याकडे केली आहे.

पंचायत समितीच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष

या तक्रार अर्जावर वैभव गावंडे, शशिकांत पवार, संदीप जाधव, नितीन राठोड, कुंदन पवार आणि मुकेश जाधव यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांनंतर पंचायत समिती प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि संबंधित ग्राम रोजगार सेवकावर कोणती कारवाई करते, याकडे दापुरा बु. येथील मनरेगा व घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा; ई-फाईल प्रणालीचा प्रभावी वापर करा: मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा; ई-फाईल प्रणालीचा प्रभावी वापर करा: मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

Hingoli Zilla Parishad: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. प्रशासकीय कामकाजात गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी ई-फाईल प्रणालीचा प्रभावी वापर करावा

Nov 16, 2026
अवैध धंदे: हिंगोली जिल्ह्यात १६६ ठिकाणच्या छाप्यात ४१ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध धंदे: हिंगोली जिल्ह्यात १६६ ठिकाणच्या छाप्यात ४१ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Illegal activities in Hingoli: मटका जुगाराच्या ९ गुन्ह्यांत ७२९१० रुपयांचा मुद्देमाल, १८ आरोपींवर कारवाई हअवैध दारू विक्रीच्या १४० गुन्ह्यात १४१ आरोपीवर कारवाई व २,११, ३४० रुपयाचा मुद्देमाल जप्त..

Nov 16, 2026
हिंगोली न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप!

हिंगोली न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप!

Hingoli Judicial Employees Strike: मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्यातील दुय्यम न्यायालयांतील (जिल्हा व तालुका स्तर) कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढ लागू करण्या

Nov 16, 2026
जिल्हा परिषद आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! SC-ST साठी ठराविक जागा राखीव ठेवण्याचा हक्क नाही

जिल्हा परिषद आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! SC-ST साठी ठराविक जागा राखीव ठेवण्याचा हक्क नाही

जिल्हा परिषद आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! SC-ST प्रवर्गासाठी विशिष्ट मतदारसंघ कायम आरक्षित ठेवण्याचा हक्क नसल्याचे स्पष्ट.

Nov 16, 2026
लोकशाहीची मूल्ये जपणे आणि अराजकतेला प्रत्युत्तर देणे ही काळाची गरज : सुनील राणे

लोकशाहीची मूल्ये जपणे आणि अराजकतेला प्रत्युत्तर देणे ही काळाची गरज : सुनील राणे

Hingoli Bharatiya Janata Party: लोकशाहीची मूल्ये जपणे, अराजकतेच्या प्रवृत्तींना ठामपणे प्रत्युत्तर देणे आणि केंद्र सरकारच्या विकासाभिमुख कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज..

Nov 14, 2026