CSMT

CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रकरणाचा तपास CIDकडे

CSMTमध्ये 35 वर्षीय इमरान शेखचा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात मृत्यू; नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप, महाराष्ट्र CIDकडून तपास सुरू.

CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रकरणाचा तपास CIDकडे

CSMT

मध्य प्रदेशातील इमरान शेख रोजगाराच्या शोधात दोन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता; शौचालयात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर रुग्णालयात मृत घोषित

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मध्य प्रदेशातील 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खंडवा येथील इमरान शेख हा रोजगाराच्या शोधात दोन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. या घटनेनंतर प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी महाराष्ट्र CIDकडे सोपवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांच्या सुमारास इमरान सीएसएमटी मुख्य आरपीएफ पोस्टवर आला होता. खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती घेण्यासाठी तो तेथे पोहोचला होता. त्यावेळी तो अस्वस्थ अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. काहीजण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तो करत होता, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

यानंतर इमरान आक्रमक झाल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. त्याने आरपीएफचे SI अनिकेत यांच्यावर हल्ला केला तसेच स्वतःलाही इजा करून घेतली, असा दावा करण्यात आला आहे. स्वतःला किंवा इतरांना इजा होऊ नये यासाठी त्याला आवरण्यात आल्याचे आरपीएफचे म्हणणे आहे.

शौचालयात गेल्यानंतर काही मिनिटांत बेशुद्ध

सुमारे 12.30 वाजता इमरानला शौचालयाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, सात ते आठ मिनिटे उलटूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला असता इमरान आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सुमारे 12.54 वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर सीएसएमटी जीआरपीने अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, इमरानच्या नातेवाईकांनी जीआरपीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही केला आहे.

इमरानकडे रेल्वेची दोन तिकिटे

मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, इमरानने यापूर्वी जीआरपी कर्मचाऱ्यांवर हात उचलला होता. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन आढळला नसल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, त्याच्याकडे रेल्वेची दोन जनरल तिकिटे सापडली.

यातील एक तिकीट खंडवा-भुसावळ, 18 सप्टेंबर 2026 रोजीचे, तर दुसरे नाशिक-दादर, 19 सप्टेंबर 2026 रोजीचे असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. इमरानची ओळख पटवण्यासाठी त्याचा फोटो भुसावळ विभाग तसेच स्थानिक पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे.

इमरान मुंबईत नेमका कोणत्या कारणासाठी आला होता आणि या काळात त्याच्या कोणत्या हालचाली झाल्या, याचाही तपास केला जात आहे.

CIDकडे तपास; पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा

आरपीएफच्या ताब्यात असताना इमरानचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची चौकशी महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या CIDकडे सोपवण्यात आला आहे. CID कोकण रेंजचे SP प्रशांत वाघुंडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे.

इमरानच्या मृतदेहाचे जेजे रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले आहे. आता पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालासोबतच सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून इमरानच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि त्यावेळची परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

 धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

विक्रोळी रेल्वे स्थानकात धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न! अनोळखी प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत वाचवले प्राण; VIDEO व्हायरल.

Nov 07, 2026
मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप! विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Nov 07, 2026
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. छातीतील संसर्गावरील उपचारानंतर प्रकृती स्थिर असून ते सिल्व्हर ओक्सवर परतले.

Nov 07, 2026
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर.

Nov 06, 2026
महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरू होणार? कंपनीचा मुंबई हायकोर्टातील अर्ज मागे; नव्या लेबलसह FSSAI कडे धाव

महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरू होणार? कंपनीचा मुंबई हायकोर्टातील अर्ज मागे; नव्या लेबलसह FSSAI कडे धाव

महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरू होणार? कंपनीने मुंबई हायकोर्टातील याचिका मागे घेत नव्या लेबलसह FSSAI कडे जाण्याचा निर्णय घेतला.

Nov 06, 2026