हिंगोली (Hingoli firecracker stockpile) : शहरातील मारवाडी गल्ली विभागात 62 यांच्या निवासस्थानात फटाक्याच्या गोदामाला आग लागून तिघांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. या घटनेमुळे प्रशासनाने दिलेल्या निर्देशावरून पोलिसांनी अनेक ठिकाणी अवैधरित्या साठवणूक केलेल्या फटाक्याच्या साठ्यावर छापे मारले ज्यामध्ये हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कारवाडी सुराणा नगर भागात साठवणूक केलेल्या 62 लाखाच्या फटाक्याचा साठा जप्त करून एका आरोपीवर गुन्हा दाखल केला.
हिंगोलीतील मारवाडी गर्ल जळीत करण्याची घटना घडल्यानंतर हिंगोली शहरासह जिल्हाभरात पोलिस व महसूल प्रशासनाच्या पथकामार्फत बेकायदेशीर त्या साठवणूक केलेल्या फटाक्याच्या साठ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. यामध्ये हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कारवाडी सुरानानगर येथे छापा टाकून 86 लाख 3 हजार 110 रुपयांचा बेकायदेशीर फटाक्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मारवाडी गल्लीतील व्यापारी विजय रामकृष्ण बासटवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी रात्री 10 वाजता आरोपीने कारवाडी सुरानानगर येथील स्वतःच्या गोडाऊनमध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा ठेवला होता. (Hingoli firecracker stockpile) नागरिकांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे माहित असतानाही हा साठा ठेवल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 125, 223, 287, 288 सह स्फोटक पदार्थ अधिनियम कलम 9 (ब) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे करीत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी जळीत कांडात मयत
हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये सोमवारी रात्री आठच्या सुमारास विजयकुमार बासटवार यांच्या निवासस्थानातील फटाक्याच्या गोदामाला आग लागून त्यांचा आगीने होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचाच सुराणा नगर भागात हा फटाक्याचा 86 लाखाचा साठा मिळून आल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.