न्यायालयीन कर्मचारी आंदोलन

समान काम,समान वेतन या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी

Court Staff Protest: न्यायिक जिल्हा अंतर्गत येणार्‍या सर्व न्यायालयात न्यायालयीन कर्मचारी यांनी समान काम, समान वेतन या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन

समान काम,समान वेतन या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी

Court Staff Protest

 

न्यायालयीन कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन

हिंगोली (Court Staff Protest) : न्यायिक जिल्हा अंतर्गत येणार्‍या सर्व न्यायालयात न्यायालयीन कर्मचारी यांनी समान काम, समान वेतन या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी १६ सप्टेंबर बुधवार रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयाच्या कर्मचार्‍यां-प्रमाणे ‘समान काम, समान वेतन’ या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या प्रस्तावावर शासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने आंदोलनाचा पहिला भाग बुधवारी जिल्हा न्यायालय, हिंगोली येथील न्यायालयीन कर्मचार्‍यांनी काळी फित लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला व कर्मचार्‍यांनी दैनंदिन कामकाजादरम्यान काळी फित लावून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.या आंदोलनात जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व.स्तर, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय, हिंगोली येथील सर्व न्यायालयीन कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदविला असल्याचे गट क. न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. देशमुख यांनी सांगितले.

टैग्स: Court Staff Protest