Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Cotton Trader

परभणीत कापूस व्यापाऱ्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

परभणीतील पाथरी शहरातील मोंढा परिसरातून कापूस व्यापारी पुरुषोत्तम सोमाणी यांचे शुक्रवारी दुपारी अपहरण करण्यात आले.


परभणीत कापूस व्यापाऱ्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

Cotton Trader |

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत व्यापाऱ्याला सुखरूप आणले; चार लाखांचा मुद्देमाल लुटला

परभणी : परभणीतील पाथरी शहरातील मोंढा परिसरातून कापूस व्यापारी पुरुषोत्तम सोमाणी यांचे शुक्रवारी दुपारी अपहरण करण्यात आले. याप्रकरणी पाथरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात ४ लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोनि. लक्ष्मण केंद्रे यांनी दिली.

पुरुषोत्तम गंगाभिषण सोमाणी हे शुक्रवारी दुपारी सोने गहाण ठेवण्यासाठी जात होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्यांना बळजबरीने उचलून नेण्यात आले. लोहा येथे नेऊन त्यांच्या जवळील २२ हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या असा ४ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेण्यात आला.

आणखी पैसे देण्यासाठी धमकावत सोमाणी यांच्या पत्नीला फोन करून आरोपीच्या फोन-पे खात्यावर ९० हजार रुपये जमा करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच आणखी २ लाख ६० हजार रुपये दे, अन्यथा तुला खतम करू, अशा धमकीचा उल्लेखही तक्रारीत आहे.

या प्रकरणात रंगनाथ भुरे, महादू महागावकर, दोघे रा. लोहा, जि. नांदेड, यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर पाथरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोउपनि. गणेश पवार करत आहेत.

अपहरण झालेल्या पुरुषोत्तम सोमाणी यांना पोखर्णी फाटा, गंगाखेड येथून सुखरूप आणण्यात आले. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: