केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीचा व राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईचाही निषेध
देवणी (Congress’s Black Day) : केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीचा निषेध तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने ८ ऑक्टोबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त देवणी तहसीलदारांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. (Congress’s Black Day) काँग्रेसचे कोषाध्यक्ष वैजनाथ मनोहरराव लुल्ले यांनी हे निवेदन तहसील कार्यालयात सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, इंडिया आघाडी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच खासदारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
या (Congress’s Black Day) आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच ज्येष्ठ नेते व खासदारांशी पोलिसांकडून कथित धक्काबुक्की व कारवाई करण्यात आल्याचा निषेध काँग्रेसने केला. हा प्रकार संविधानिक मूल्ये आणि लोकशाही व्यवस्थेवरील आघात असल्याची भूमिका काँग्रेसने निवेदनातून मांडली आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले
विशेष मतदार यादी पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवरून विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची तसेच बडतर्फीची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असणे आवश्यक असून, त्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याचा अधिकार विरोधकांना असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसच्या वतीने राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर ८ ऑक्टोबर रोजी आंदोलन करून हा दिवस ‘लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देवणी तालुका काँग्रेसनेही तहसील कार्यालयात निवेदन देत केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीचा निषेध नोंदविला.
दरम्यान, राजकीय पक्षांच्या भेटीसंदर्भात निवडणूक आयोगाने ठरावीक प्रोटोकॉल असल्याचे स्पष्ट केले आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत प्रतिनिधीमार्फत भेटीची मागणी केली नव्हती, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून काँग्रेस आणि आयोग यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लढा सुरूच’
लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधानाची प्रतिष्ठा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता कायम राहावी, यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी काँग्रेसने आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. यावेळी वैजनाथ मनोहरराव लुल्ले, ॲड. अजित बेळकोने विळेगावकर, औदुंबर पांचाळ होनाळीकर, जि. प. सदस्य शरण लुल्ले, मालबा घोनसे तळेगावकर, देविदास पतंगे, अनिल पाटील, रतन पाटील नागराळकर, बाबुराव लांडगे, शिवाजी राठोड, शिवा भाऊ कांबळे, रमेश बिरादार, शिवाजी कोटे आदी उपस्थित होते.