कॉग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवारांनी घेतली पिडीत कुटूंबांची भेट
हिंगोली (Vijay Wadettiwar) : सरकारने शेतकर्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे व त्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे अशी आमची भुमिका असून या बाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला जाईल, असे अभिवचन कॉग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
हिंगोली शहरातील अकोला बायपास भागातील सराफ बँक्वेट हॉल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सचिन नाईक, डॉ . सतिश पाचपुते, अब्दुल हफीज, सुरेश आप्पा सराफ, जकी कुरेशी, शामराव जगताप, डॉ. रमेश शिंदे, दत्तराव कदम, भगवान खंदारे, गजानन देशमुख, मिलिंद उबाळे आदींची उपस्थिती होती.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे दोन दिवसीय हिंगोली जिल्हा दुष्काळ दौर्यावर आले असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले १९७२ नंतर सर्वात मोठा दुष्काळ आहे सहा महिन्यापुर्वी सरकारला अलनिनोचा प्रभाव असल्याचे कळुन देखील काहीच उपाय योजना केल्या नाहीत. कृत्रीम पावसाची प्रक्रिया केली असती तर हि परिस्थिती आली नसती असे त्यांनी सांगितले सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या नाकर्तेपणा मुळे शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. सरकारने कोणत्याही परिस्थितीत १ लाख रुपयांची हेक्टरी मदत दिली पाहिजे चारा छावण्या सुरु केल्या पाहिजेत पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. यावरुन सरकारने उपाय योजना केल्या पाहिजेत. नवीन कामे रद्द केली पाहिजे कुंभमेळ्यावर खर्च करणे गरजेचे नाही शेतकर्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. शक्तीपीठ रद्द केला पाहिजे शेतकरी कर्जमुक्त कसा होईल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी (Vijay Wadettiwar) सांगितले.
फटाके जळीत कांड प्रकरणी महसुल विभागाच्या अधिकार्यांना जबाबदार धरावे
हिंगोली शहरात घडलेल्या फटाके जळीत कांडाबाबत महसूल प्रशासनाला जबाबदार धरुन अधिकार्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजे. फटाक्यांचा घरात साठा करण्याची परवानगी दिलीच कशी असा जाब विचारला पाहिजे दोषींवर कारवाई केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.या संदर्भात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचेही काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टिवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.
एकच युध्द शक्तीपीठ रद्द घोषणांनी परिसर दुमदुमला
दरम्यान यावेळी वसमत व कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांना यावेळी शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी करत वडेट्टीवार यांना निवेदन दिले यावेळी शेतकर्यांनी एकच युध्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना ठेचा भाकर दिली.
विजेची समस्या असलेला हिंगोली हा राज्यात एकमेव जिल्हा
जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्यात पावलो पावली विजेची समस्या दिसून आल्याचे विजय वडेट्टीवारांनी सांगितले. सेलसुरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाच्या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी वीजेची मोठी समस्या असल्याचे निर्दशनास आणुन दिले. यावरून वडेट्टीवारांनी जिल्हाधिकार्यांना याकडे लक्ष घालण्याचे निर्देश दिले. हिंगोली जिल्ह्यात लोडशेडिंग सुरू आहे सहा आमदार आणि दोन खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. मग जनतेच्या प्रश्नांसाठी हे लोकप्रतिनिधी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.