Child Sexual Abuse Material

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

​​​​​​​छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

Child Sexual Abuse Material

UPI व्यवहारांमधून देशभरातील ग्राहकांचा मागोवा; ३,०४१ व्हिडिओ डिलीट केल्याचा प्रयत्न, फॉरेन्सिक तपास सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणात बी.कॉम द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे पार्थ सुनील कुलकर्णी आणि शुभम राजेंद्र लोहाडे या दोघांना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान डार्कनेटशी संबंधित मोठ्या साखळीचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

तपासानुसार, आरोपी टेलिग्रामवरील चॅटिंग, डेटिंग आणि पॉर्न ग्रुप्सचा वापर करून ही सामग्री ग्राहकांपर्यंत पोहोचवत होते. बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ १०० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जात होते, तर अश्लील छायाचित्रांसाठी अवघे ५ रुपये आकारले जात होते. पार्थ टेलिग्रामवरील खाती हाताळून ग्राहकांना साहित्य पाठवत होता, तर शुभम यूपीआयद्वारे स्वतःच्या बँक खात्यात पैसे स्वीकारत होता.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना १ ऑगस्ट रोजी या प्रकाराची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर संशयितांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली. त्यानंतर २ आणि ३ ऑगस्ट रोजी पार्थ आणि शुभम स्वतः पोलिसांसमोर हजर झाले.

पोलिसांनी दोघांचे मोबाईल आणि टॅबची तपासणी केली असता, पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी क्लाउड स्टोरेजमधील मोठ्या प्रमाणातील डेटा हटविल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणात त्यांच्या क्लाउड खात्यांमध्ये तब्बल ३,०४१ अश्लील व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलिसांनी २०० व्हिडिओ जप्त केले असून, हटविण्यात आलेला डेटा फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने पुन्हा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, शुभमच्या बँक खात्यातील यूपीआय व्यवहारांची चौकशी करताना २०२३ पासून गुजरात, पंजाब, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथील ग्राहकांकडून पैसे आल्याचे स्पष्ट झाले. या खात्यावर दरमहा ६० ते ७० व्यवहार होत असून, त्यातून २० ते २५ हजार रुपये जमा होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. शुभमच्या खात्याव्यतिरिक्त आणखी एका साथीदाराच्या खात्यावरही पैसे स्वीकारले जात असल्याचे पोलिसांना आढळले आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, पार्थ आणि शुभम हे या साखळीतील केवळ वितरक असल्याचा संशय आहे. मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ पुरवठा करणारा मुख्य स्रोत परराज्यातील एका डार्कनेट सिंडिकेटशी संबंधित असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षांतील हजारो डिजिटल व्यवहारांचा तपास सुरू असून, या माध्यमातून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

संबंधित सामग्री

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रा. अदितीताई पोहरेंना विजयी करा; युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांचे आवाहन

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रा. अदितीताई पोहरेंना विजयी करा; युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांचे आवाहन

मानोरा तालुक्यात प्रा. अदितीताई पोहरे यांच्या प्रचाराला वेग. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांनी केले.

Oct 17, 2026
दिल्लीतील ‘तिरंगा मार्च’ प्रकरणात CJP प्रमुख अभिजित दीपके यांना जामीन

दिल्लीतील ‘तिरंगा मार्च’ प्रकरणात CJP प्रमुख अभिजित दीपके यांना जामीन

दिल्लीतील तिरंगा मार्च प्रकरणात CJP प्रमुख अभिजित दीपके आणि नेहा बोरा यांना जामीन. सौरभ दास आणि आशुतोष रांका अद्याप न्यायालयीन कोठडीत.

Oct 17, 2026
बिस्किटांत पशुखाद्याचा कोंडा, दुधात डिटर्जंट; FSSAI ची तीन कंपन्यांविरोधात कारवाई

बिस्किटांत पशुखाद्याचा कोंडा, दुधात डिटर्जंट; FSSAI ची तीन कंपन्यांविरोधात कारवाई

Priyagold बिस्किटांतील कोंडा, Dodla Dairy च्या दुधातील संशयास्पद घटक आणि पिवळ्या मनुकांतील कीटकनाशकांच्या अवशेषांप्रकरणी FSSAI ची कारवाई.

Oct 17, 2026
ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या

ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगात मोठे फेरबदल झाले असून, २०२५-२६ मध्ये सुमारे २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे.

Oct 17, 2026
पादचारी क्रॉसिंगच्या दिरंगाईवर सुप्रीम कोर्ट संतप्त; म्हणाले, 'आम्हीच धरणे धरणार!'

पादचारी क्रॉसिंगच्या दिरंगाईवर सुप्रीम कोर्ट संतप्त; म्हणाले, 'आम्हीच धरणे धरणार!'

दिल्ली हायकोर्टाजवळील पादचारी मार्गाच्या दुरुस्तीतील विलंबावर सुप्रीम कोर्ट संतप्त. प्रशासनाला २५ नोव्हेंबरची मुदत; अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा.

Oct 17, 2026