जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले महिला स्टाफसोबत जिजाऊ माँ साहेबांचे पूजन
बुलढाणा (CEO Bhalchandra Chavan) : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या बाल शिवबासह शिल्पाचे पूजन नव्यानेच पदभार घेतलेले मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण (CEO Bhalchandra Chavan) यांनी केले, यावेळी मुख्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. जिजाऊ माँ साहेबांनी शिवबांना केवळ लढण्याचेच धडे दिली नाहीतर प्रशासकीय कामकाजाची सुद्धा शिकवण दिली होती, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्य तयार होऊ शकले.. त्यामुळे राजमाता जिजाऊ या प्रशासकीय गुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी चव्हाण यांनी यावेळी केले.
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार नुकताच भालचंद्र चव्हाण (CEO Bhalchandra Chavan) यांनी स्वीकारला असून, त्यांनी आज मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी मुख्य प्रवेशद्वारावरील राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या बाल शिवबासह राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या शिल्पाचे पूजन केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आशिष पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रुंदा श्रीपत कुलकर्णी व जयमाला बाबुराव राठोड, सहाय्यक प्रशासन अधिकारी राधा सुभाष उबरहंडे, पुष्पा संजय गायकवाड, अरुणा पांचाळ, मंजुषा मेंढे, पोर्णिमा रोटे, अदिती दिनोदे, शोभा गवारगुरु, उज्वला झोपे, लीना गोरे, राधा गोसावी, जयश्री पाटील, संगीता कोळी, पुष्पा जाधव, लक्ष्मी खरे, लता गुंजकर, रूपाली पाटील, अर्चना देशमुख, आशा बरडे, संगीता सुरडकर, वैशाली देवकर, आरती गवई, राजश्री उबाळे, प्रिया जाधव, कीर्ती खडसे, तनुजा मोरे, तनुजा जाधव, शितल गादे, प्रतिभा सोळंकी,.अर्चना टेकाळे, मोनाली किन्होळकर, लता लाड, संगीता घोंगे, श्रद्धा कांबळे, प्रतीक्षा राजपूत, निर्मला सोनुने व अश्विनी पवार यांची प्रामुख्याने उपस्थित होती.