केंद्रीय जिल्हा परिषद शाळा

केंद्रीय जिल्हा परिषद शाळेची भयंकर अवस्था  इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी शिकतात एकाच वर्गात!

Central Zilla Parishad School: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा वसमत, इयत्ता पहिली ते आठवी चे वर्ग एकाच खोलीत या सर्वांसाठी एकच शिक्षिका, आठ वर्गातील एकूण हजर विद्यार्थी 20 ते 22, तीन शिक्षक

केंद्रीय जिल्हा परिषद शाळेची भयंकर अवस्था  इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी शिकतात एकाच वर्गात!

Central Zilla Parishad School

 

तीन शिक्षकां पैकी एक रजेवर, एक बीएलओच्या कामावर; पहिली ते आठवी वर्गावर एक शिक्षिका

वसमत (Central Zilla Parishad School) : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा वसमत, इयत्ता पहिली ते आठवी चे वर्ग एकाच खोलीत या सर्वांसाठी एकच शिक्षिका, आठ वर्गातील एकूण हजर विद्यार्थी 20 ते 22, तीन शिक्षकांपैकी मुख्याध्यापक रजेवर एक शिक्षक बीएलओच्या कामावर एक शिक्षिका हजर एकूण पटसंख्या 44 शिक्षणाची एवढी भयंकर अवस्था वसमत शहरातील  केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची आहे शहराच्या मुख्य भागात असलेल्या शाळेची अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद शिक्षणाची काय अवस्था असेल हा प्रश्न उपस्थित होत आहे

शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या गप्पा मारल्या जात असताना प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा पुरता बोजवारा उडत असल्याचे वसमत शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहावयास मिळत आहे. देशोन्नतीने दिनांक 15 ऑक्टोबर गुरुवारी वसमत शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट दिली असता  इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून ठेवल्याचे पहावयास मिळाले शाळेतील तीन शिक्षकांपैकी एक मुख्याध्यापक  रजेवर, तर दुसरे शिक्षक बीएलओच्या कामावर असल्याने एक शिक्षिका इयत्ता पहिली ते आठवी चे विद्यार्थी एकाच वर्गात बसवून स्वतः बसून होत्या  पहिली ते आठवीच्या विद्यार्थी एकाच वर्गात असल्याने त्या नेमक्या काय शिकवत असतील हा प्रश्न कायमच आहे.

शाळेत उपस्थित शिक्षिका यांना विचारले असता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, वसमत येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण ४४ विद्यार्थी पटसंख्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गुरुवारी शाळेला भेट दिली असता यापैकी केवळ  20 ते 22 विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना अक्षरओळख, वाचन आणि लेखनाचे धडे देण्यापासून ते आठवीतील विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अध्यापन एका स्वर्गात एकत्र कसे होत असेल एकच शिक्षिका कशा शिकवीत असतील प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि विषयांची गरज वेगवेगळी असताना सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी गुणवत्तापूर्ण शिक्षण  मिळत असेल का असा प्रश्न या भयंकर परिस्थितीवरून उपस्थित होत आहे.

शाळेत तीन शिक्षक कार्यरत असताना मुख्याध्यापक रजेवर गेले आणि दुसऱ्या शिक्षकाची बीएलओच्या कामासाठी नियुक्ती  म्हणून  बीएलओ शाळा सोडून मतदारांच्या मागे गेले असतील शाळेत हजर नसतील तर एक शिक्षिका काय शिकवत असेल विद्यार्थी काय शिकत असतील त्यांच्या ज्ञानात काय फरक पडत असेल अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य कसे असेल असे अनेक भयंकर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे शिकवणे, त्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणे, गृहपाठ तपासणे आणि प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम  पूर्ण करणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्व बाबी गौन ठरत असून फक्त शिक्षकांचे पगार काढण्या पुरती शाळा चालवली जात असल्याचेच समोर येत आहे. 

पिढी घडवता का पिढी बरबाद करतात
जिल्हा परिषद मुख्याधिकारी विवेक गायकवाड हे शिक्षणाच्या बाबतीत व शिस्तीच्या बाबतीत गंभीर असल्याची चर्चा असते मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या शाळातील अवस्था त्याच्या विपरीत दिसत आहे.

वसमत शहरातील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतच अशा प्रकारची भयंकर परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाची काय अवस्था असेल, त्याची कल्पना न केलेली बरी पहिली ते आठवीचे विद्यार्थी एकाच  बसवले जात असेल तर येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पिढी घडते का पिढी बरबाद होते हे पाहणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांनी कडक भाषणापेक्षा प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळांची अवस्था किती भयंकर आहे  हे एकदा त्यांनी धडक शाळेत येऊन तपासण्याची गरज आहे

केवळ बैठका, भाषणे आणि कागदोपत्री गुणवत्ता सुधार  या ऐवजी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे विद्यार्थी संख्या नाही आम्ही काय करायचे या सोयीस्कर उत्तराखाली केवळ शिक्षकांचे पगार काढण्यापुरती शाळा चालवणे म्हणजे पिढ्या बरबाद करण्याचा प्रकार आहे वसमत शहरातील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागात शिक्षणाची काय बोंबाबोंब असेल याकडे जिल्हा परिषद मुख्याधिकारी विवेक गायकवाड यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन तपासण्याची गरज आहे.

केंद्रीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या
वसमत येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील पटसंख्या व वर्ग निहाय विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे आहे इयत्ता पहिली एकूण विद्यार्थी 04, इयत्ता दुसरी एकूण विद्यार्थी 01, इयत्ता तिसरी एकूण विद्यार्थी 06, इयत्ता चौथी एकूण विद्यार्थी 04, इयत्ता पाचवी एकूण विद्यार्थी 06, इयत्ता सातवी एकूण विद्यार्थी 12, इयत्ता आठवी एकूण विद्यार्थी 05 असे एकूण 44 पटसंख्या असल्याचे उपस्थित शिक्षिका यांनी सांगितले मात्र शाळेत प्रत्यक्षात वीस ते बावीस विद्यार्थी हजर होते.