Cattle Fodder

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती आणि अवैध साठेबाजीवर बंदी

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती, अवैध साठेबाजी आणि विनापरवानगी वाहतुकीवर बंदी. उल्लंघन केल्यास जप्ती व कायदेशीर कारवाई.

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती आणि अवैध साठेबाजीवर बंदी

Cattle Fodder

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय; कुटाराच्या जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी पूर्वपरवानगी अनिवार्य, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

हिंगोली : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन, तूर आणि अन्य पिकांपासून मिळणारे कुटार (वैरण) पशुधनाच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत. या कुटाराचा वापर बायोमास ब्रिकेट्स (गट्टू) आणि पेलेट्स तयार करण्यासाठी करण्यास बंदी घालण्यात आली असून, औद्योगिक वापरासाठी अवैध साठेबाजी करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

सन २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने हिंगोली जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली आहे. आगामी काळात जनावरांसाठी हिरवा आणि सुका चारा अपुरा पडण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे. सध्या सोयाबीन पिकाची काढणी आणि मळणी सुरू असून, सोयाबीन व तूर पिकांपासून मिळणारे कुटार पशुधनाच्या संगोपनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर कुटाराचा औद्योगिक इंधन म्हणून वापर वाढल्यास स्थानिक पातळीवर चाऱ्याची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कुटाराचा वापर आणि साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत.

कुटाराच्या अवैध साठेबाजीला आणि औद्योगिक पुरवठ्याला प्रतिबंध

कुटाराची खरेदी करून औद्योगिक वापरासाठी साठवणूक करणे किंवा बायोमास ब्रिकेट्स तयार करणाऱ्या उद्योगांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने अवैध साठा करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कुटार स्थानिक पशुपालक, शेतकरी, मान्यताप्राप्त गोशाळा आणि गौरक्षण संस्थांव्यतिरिक्त इतर घटकांना औद्योगिक वापरासाठी पुरवता येणार नाही.

जिल्ह्याबाहेर वाहतुकीसाठी पूर्वपरवानगी आवश्यक

हिंगोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत कुटाराची वाहतूक करायची असल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल.

अधिकृत गोशाळा, गौरक्षण संस्था किंवा दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांच्या जनावरांसाठी कुटार पाठवताना आवश्यक परवानगीसोबतच संबंधित वाहतूक पशुखाद्यासाठीच केली जात असल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे लागणार आहे.

संयुक्त भरारी पथकांकडून तपासणी

कुटाराची अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी आणि बायोमास ब्रिकेट्स निर्मिती करणाऱ्या उद्योगांवर देखरेख ठेवण्यासाठी तालुकास्तरावर संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत.

या पथकांमध्ये तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांचा समावेश असेल. ही पथके संबंधित उद्योगांची तपासणी करतील. तसेच महामार्गांवरून होणाऱ्या कुटाराच्या वाहतुकीवरही लक्ष ठेवणार आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास जप्ती आणि कायदेशीर कारवाई

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कुटाराचा औद्योगिक वापर केल्याचे किंवा अनधिकृत वाहतूक सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित वाहन, यंत्रसामग्री आणि कुटाराचा साठा जप्त करण्यात येईल. याशिवाय संबंधित व्यक्ती, कारखानदार आणि व्यापाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६०, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

हा आदेश १२ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू राहणार आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! थकबाकीमुळे बंद केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू होणार

दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! थकबाकीमुळे बंद केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू होणार

दुष्काळग्रस्तांना दिलासा! थकबाकीमुळे बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू होणार; ऊर्जा विभागाचा शासन निर्णय जारी.

Oct 31, 2026
हिंगोली जळीतकांडातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

हिंगोली जळीतकांडातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

हिंगोली जळीतकांडातील तिघांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत. आमदार संतोष बांगर आणि श्रीराम बांगर यांच्या हस्ते रक्कम सुपूर्द.

Oct 31, 2026
हिंगोलीतील महादेव वाडीत ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार

हिंगोलीतील महादेव वाडीत ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार

हिंगोलीच्या महादेव वाडीतील ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा २०२६ मध्ये भव्य जीर्णोद्धार; नवरात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतले दर्शन.

Oct 24, 2026
हिंगोली जिल्ह्यात चारा टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या विविध उपाययोजना

हिंगोली जिल्ह्यात चारा टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या विविध उपाययोजना

Hingoli Fodder Shortage: जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Oct 19, 2026
सायबर गुन्हेगारांच्या नवीन फंड्यांपासून सावधान!; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांचे नागरिकांना आवाहन

सायबर गुन्हेगारांच्या नवीन फंड्यांपासून सावधान!; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांचे नागरिकांना आवाहन

हिंगोलीत सायबर फसवणुकीबाबत पोलिसांचे आवाहन. OTP, QR Code, Digital Arrest आणि KYC Fraud पासून सावध राहा. फसवणूक झाल्यास 1930 वर संपर्क साधा.

Oct 14, 2026