हिंगोली (Aundha police Case) : आमदरी शिवारात कैलास कांबळे यांच्या आखाड्यासमोर दोघेजण भांडण करीत असून त्यांच्याकडे तलवार असल्याची माहिती १८ ऑक्टोंबरला औंढा ना.पोलीसांना मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी पोउपनि शेख खुद्ुस यांच्यासह पथकाला घटना स्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळी जाताच दोघेजण आपसात झुंज करीत होते. पोलीस दिसताच सुधाकर उर्फ मुन्ना संभाजी पावडे रा.सोडेगाव याने पळ काढला.परंतु सदर ठिकाणी बळीराम विठ्ठल हजारे रा.सोडेगाव याला ताब्यात घेतले.
या (Aundha police Case) प्रकरणी औंढा ना.पोलीसात ओंकारेश्वर रांजणेकर यांच्या फिर्यादीवरून बळीराम विठ्ठल हजारे, सुधाकर उर्फ मुन्ना संभाजी पावडे रा.सोडेगाव या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलीसात यामध्ये तलवार जप्त केली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्यासह पोउपनि शुख खुदूस, ज्ञानेश्वर सावळे, राजु ठाकुर, ओंकारेश्व रांजणेकर, राजकुमार कुटे, शाहीद, रावसाहेब काळे, गोरखनाथ विसलकर, राहुल राठोड यांनी केली.
औंढा पोलीस गुन्हा दाखल
आमदरी शिवारात एकाला तलवारीसह पकडले; गुन्हा दाखल
Aundha police Case: आमदरी शिवारात कैलास कांबळे यांच्या आखाड्यासमोर दोघेजण भांडण करीत असून त्यांच्याकडे तलवार असल्याची माहिती १८ ऑक्टोंबरला औंढा ना.पोलीसांना मिळाली.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Aundha police Case
टैग्स:
Aundha police Case