विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण

'आदर्श'चा संस्थापक बशीर शेख पोलिसांच्या ताब्यात!

Female Student Sexual Harassment: अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आदर्श इंटरनॅशनल स्कूलचा संस्थापक तसेच प्राचार्य बशीर उस्मान शेख यास अटक

'आदर्श'चा संस्थापक बशीर शेख पोलिसांच्या ताब्यात!

Female Student Sexual Harassment

 

अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणात फरार होता आरोपी

लातूर (Female Student  Sexual Harassment)  : अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आदर्श इंटरनॅशनल स्कूलचा संस्थापक तसेच प्राचार्य बशीर उस्मान शेख (वय 54 वर्षे, रा. प्रकाश नगर, लातूर) यास अखेर लातूर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. बशीर शेख यास अटक करून त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी लातूरमधील विविध संघटनांनी गेले अनेक दिवस पोलिसांकडे पाठपुरावा चालविला होता. अखेर या संघटनांच्या आंदोलनाला हे यश आले असून पोलिसांनी त्यात अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीआर नं. 687/2026 अन्वये बीएनएस कलम 74, 76, 351(2) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8 व 12 अन्वये अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Female Student  Sexual Harassment) पोलिसांच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल होण्याच्या एक दिवस अगोदरच आरोपी फरार झाला होता.‌ गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्यास अटक करण्यात यावी. यासाठी लातूरमधील विविध सामाजिक संघटनांनी आंदोलने केली तसेच पोलिसांकडे पाठपुरावा चालविला होता. त्यामुळे त्यास अटक करण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन विशेष पथकांकडून शोधमोहीम चालविली होती. पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर अटक केली आहे.

स्वतःहून दाखल झाला का आरोपी? संदिग्धता कायम!
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चावरे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकारी व बारा पोलीस अंमलदारांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली. या (Female Student  Sexual Harassment) पथकांनी उदगीर, उमरगा, पुणे, पनवेल आणि पालघर आदी ठिकाणी सातत्याने तपास व शोधमोहीम राबविली.  आरोपी बुधवारी रात्री उशिरा पोलिसांच्या हाती लागल्याने  त्यास ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र आरोपीला पोलिसांनी कोणत्या शहरात ताब्यात घेतले किंवा जेरबंद केले, याबाबतचा तपशील देण्याचे या प्रसिद्ध पत्रकात जाणीवपूर्वक टाळले आहे. त्यामुळे फरार आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले की तो फरार आरोपी स्वतःहून पोलिसात दाखल झाला? याबाबत संदिग्धता कायम आहे.

संबंधित सामग्री

सरकारी शाळेत शिकणाऱ्या लेकीची 14 व्या वर्षीच अंतराळभरारी!

सरकारी शाळेत शिकणाऱ्या लेकीची 14 व्या वर्षीच अंतराळभरारी!

Kandula Jesi: विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थिनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय 'कंडुला जेसी'ची देशभर चर्चा..

Aug 12, 2026
तुळसाबाई कावल विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

तुळसाबाई कावल विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

Rani Ingale: पातूरच्या तुळसाबाई कावल विद्यालयातील राणी अलका ज्ञानेश्वर इंगळे हिने बारावी आणि बी.टेक पूर्ण केल्यानंतर एमबीएसाठी निवड मिळवून विद्यालयाच्या शिरपेच्यात एक नवा मानाचा तुरा

Jun 01, 2026