शेत कापूस चोरी प्रकरण

शेतातील कापूस चोरीप्रकरणी दोघांना अटक; बालक ताब्यात हिंगणघाटातून आरोपी जेरबंद

Farm Cotton Theft Case: शेतातून कापूस चोरी करणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस पथक, वरोरा यांनी शोध घेत दोघांना अटक केली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात...

शेतातील कापूस चोरीप्रकरणी दोघांना अटक; बालक ताब्यात हिंगणघाटातून आरोपी जेरबंद

Farm Cotton Theft Case

 

झायलो कारसह ५ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त

वरोरा (Farm Cotton Theft Case) : शेतातून कापूस चोरी करणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस पथक, वरोरा यांनी शोध घेत दोघांना अटक केली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हिंगणघाट (जि. वर्धा) येथे करण्यात आली. या कारवाईत चोरीचा २५४ किलो कापूस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा झायलो कार असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत कापूस चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हिंगणघाट येथे छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले.

या (Farm Cotton Theft Case) प्रकरणात सागर लक्ष्मण चव्हाण (वय २९, रा. नागरी, ता. वरोरा) आणि अमोल महादेव जाधव (वय २२, रा. दहेगाव, ता. सेलू, जि. वर्धा, सध्या रा. हिंगणघाट) या दोघांना अटक करण्यात आली. 

पोलिसांनी आरोपींकडून २५४ किलो चोरीचा कापूस, किंमत २३ हजार रुपये, तसेच कापूस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा झायलो कार (MH 31 CS 6213), किंमत अंदाजे पाच लाख रुपये, असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस पथक, वरोरा यांच्या संयुक्त कारवाईमुळे कापूस चोरीच्या या प्रकरणाचा उलगडा झाला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.