मेणबत्त्यांच्या प्रकाशात लपलेली निदा खान; उघडकीनंतर महापालिकेचा बुलडोझर

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बुधवारी AIMIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या निवासस्थानासह इतर मालमत्तांवरील कथित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला.

मेणबत्त्यांच्या प्रकाशात लपलेली निदा खान; उघडकीनंतर महापालिकेचा बुलडोझर

Bulldozer Action

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची कारवाई; AIMIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवरील अनधिकृत बांधकामे पाडली

छत्रपती संभाजीनगर (Bulldozer Action) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बुधवारी AIMIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या निवासस्थानासह इतर मालमत्तांवरील कथित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. नाशिक येथील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

निदा खानला ७ मे रोजी मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या मते, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेते मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिला होता.

निदा खान ज्या घरात लपून बसली होती. त्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा घरात मेणबत्त्या पडलेल्या दिसल्या. निदा खान या घरात लपलेली असताना घरातील विजेचा वापर केला जात नव्हता. कुणालाच कळून येऊ नये, यामुळे निदा खान घरातील कोणतीही लाईट चालू करत नव्हती. निदा खान घरात मेणबत्ती लावून राहत होती. आज जेव्हा पालिकेचे अधिकारी दरवाजाचा कुलूप तोडून घरात गेले, तेव्हा मेणबत्त्या आढळून आल्या.

९ मे रोजी महापालिकेने शहरातील नरेगाव परिसरातील पटेल यांच्या कथित अनधिकृत बांधकामांबाबत नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये ७२ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. जर उत्तर मिळाले नाही, तर मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे नोटीसमध्ये नमूद होते.

यानंतर पटेल यांनी या प्रकरणात स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही.

बुधवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात पटेल यांच्या घर, कार्यालय तसेच काही दुकानांवरील अनधिकृत बांधकामे पाडली, अशी माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली.

दरम्यान, मंगळवारी रात्री माजी AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी नरेगाव येथे पटेल यांच्या कुटुंबीयांची भेट घेत महापालिकेच्या कारवाईवर टीका केली. “आम्ही न्यायालयाकडे एका आठवड्याची मुदत मागितली होती, मात्र महापालिका घाईत कारवाई करत आहे. हा आमच्यासाठी महत्त्वाचा काळ आहे. तरीही, पाडकामानंतर आम्ही मतीन आणि त्यांच्या कुटुंबासाठी देशाला दिसेल असे घर उभारू,” असे जलील यांनी समर्थकांशी संवाद साधताना सांगितले.

महापौर राजूरकर यांनी सोमवारी सांगितले होते की, पटेल यांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

“जर पटेल यांनी अनियमितता केली असेल, तर त्यांचे सदस्यत्व रद्द केले पाहिजे. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार निवडणूक अर्ज भरताना कोणतीही माहिती लपवता कामा नये,” असे ते म्हणाले होते.

दरम्यान, निदा खान ही नाशिक येथील टीसीएस युनिटमधील काही महिला सहकाऱ्यांच्या कथित धार्मिक रूपांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी आहे. तिला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) टीसीएसच्या नाशिक कार्यालयातील छेडछाड आणि अत्याचाराच्या नऊ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

टीसीएसने याप्रकरणी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा जबरदस्तीबाबत कंपनीची शून्य-सहनशीलता धोरण आहे. नाशिक कार्यालयातील कथित लैंगिक छळप्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन; समान वेतनासाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

हिंगोलीत जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन; समान वेतनासाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

हिंगोलीत समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा, तर १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा.

Oct 16, 2026
रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात बनावट NA आदेश, 223 प्लॉट आणि झाडांच्या लागवडीचा दावा

रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात बनावट NA आदेश, 223 प्लॉट आणि झाडांच्या लागवडीचा दावा

रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात 223 प्लॉट आणि चंदन-आंब्याच्या लागवडीच्या नोंदींची चौकशी करण्याची मागणी.

Oct 16, 2026
मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे १० ते १५ टक्के दरवाढीचा विचार सुरू आहे.

Oct 15, 2026
दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दिवाळी २०२६ मध्ये एसटी भाडेवाढीला ब्रेक! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रस्तावित १५ टक्के हंगामी वाढ नामंजूर केली.

Oct 15, 2026
सरपंच संघटनेची पातूर तालुका कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी गणेश राठोड, उपाध्यक्षपदी नंदाताई काळे

सरपंच संघटनेची पातूर तालुका कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी गणेश राठोड, उपाध्यक्षपदी नंदाताई काळे

पातूर तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित. अध्यक्षपदी गणेश राठोड, तर उपाध्यक्षपदी नंदाताई काळे यांची अविरोध निवड. ग्रामपंचायतींच्या विकासासाठी कार्यकारिणी प्रयत्नशील राहणार.

Oct 15, 2026