बुलढाणा कोरडा दुष्काळ

दुष्काळाच्या यादीतून जिल्हा वगळल्याने शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

Buldhana Dry Drought: राज्य शासनाच्या दुष्काळ यादीतून बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटना व क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांची भेट

दुष्काळाच्या यादीतून जिल्हा वगळल्याने शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

Buldhana Dry Drought

 

कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख मदत व संपूर्ण कर्जमाफीची शेतकरी संघटनांची मागणी

चिखली (Buldhana Dry Drought) : राज्य शासनाच्या दुष्काळ यादीतून बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटना व क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाळून नष्ट झाली उत्पन्नात मोठी घट निर्माण झाली आहे.असे असताना जिल्ह्याला यादीतून वगळणे हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास किसनराव कणखर, एकनाथ थूटे, दामोधर शर्मा, विनायक सरनाईक, मुरलीधर येवले यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाने जिल्ह्यातील पिकांच्या सद्यस्थितीबाबत व त्यावरील करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.निवेदनापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शासनाला जाग यावी यासाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ४० दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, मका, उडीद, मूग व भाजीपाला या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. लाखो रुपये कर्ज काढून पेरणी केलेला शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. हवामान खात्याने देखील कमी पावसाची नोंद घेतली असून या खंडामुळेच खरीप हातचा गेला आहे.

शिष्टमंडळाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे -
बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळ (Buldhana Dry Drought) यादीत समाविष्ट करून संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी बिनअट करावी.
पीक विमा कंपन्यांकडे असलेली भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा द्यावा व वीज तोडणीची कारवाई थांबवावी.

शासनाने आठ दिवसांच्या आत योग्य निर्णय न घेतल्यास संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी रविकांत तुपकर, देविदास कणखर, एकनाथ पाटील, दामोधर शर्मा दामोदर जी शर्मा रणजीत जी डोसे मुरली महाराज येवले तेजराव मुंडे सुखदेव नरोटे प्रकाश भाऊ अंभोरे प्रकाश घुबे विलास मुजमुले दिनकरराव घुबे गणेश थुटे राजू ठाकूर रितेश पाटील विठ्ठल वानखेडे सुनील करांगळे आत्माराम गाडे, शेषराव शेळके यांनी दिला.

टैग्स: Buldhana Dry Drought