मानोरा (Umri Youth Dead Body) : तालुक्यातील पोहरादेवी परिसरातील सेवालाल नगर परिसरात एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख उमरी येथील रवी रमेश राठोड ( २५ ) अशी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता वन्यप्राण्यांनी शरीराचे नुकसान केले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार दिनांक ८ ऑक्टोबरच्या रात्रीपासून रवी राठोड घरी परतला नव्हता. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या नातेवाइकांना मोबाईलद्वारे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. वसंतनगर ते सिंगद कडे जाणाऱ्या मार्गावरील, अक्षरा वाईन बारच्या मागील बाजूस सुमारे ५०० मीटर अंतरावर सेवालाल नगरातील नवीन प्लॉटिंग परिसरात हा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था गंभीर दिसून येत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी मृताच्या नातेवाइकाने पोलिसांकडे फिर्याद दिली असल्याचे समजले असुन मृत्यूचे नेमके कारण आणि (Umri Youth Dead Body) घटनेमागील परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेला नाही. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला की मृत्यूनंतर शरीराचे नुकसान झाले, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने साधस्थितीत निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार असल्याने पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.
उमरी तरुण मृतदेह
उमरी बु परिसरात आढळला तरुणाचा मृतदेह; पोलिसांकडून पंचनामा
Umri Youth Dead Body:तालुक्यातील पोहरादेवी परिसरातील सेवालाल नगर परिसरात एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख उमरी येथील रवी रमेश राठोड
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Umri Youth Dead Body
टैग्स:
Body of a youth from Umri