भाजप महिला मोर्चा

परभणीत भाजप महिला मोर्चाचे निषेध आंदोलन...!

BJP Mahila Morcha: जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस विरोधात सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले.

परभणीत भाजप महिला मोर्चाचे निषेध आंदोलन...!

BJP Mahila Morcha

 

काँग्रेस खासदाराचे कथित प्रकरण: कारवाईची मागणी

परभणी (BJP Mahila Morcha) : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस विरोधात सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत संबंधित काँग्रेस खासदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंदोलना दरम्यान काँग्रेस खा. डॉ. अंगोमचा बिमोल अओकेईजाम यांच्या वरील आरोपांच्या पार्श्वभुमीवर भाजप महिला मोर्चाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित खासदाराने तातडीने राजीनामा द्यावा, काँग्रेस पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी करावी, कायदेशीर चौकशी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. (BJP Mahila Morcha) आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा प्रतिनिधी मंगल मुदगलकर, जिल्हाध्यक्ष मनीषाताई जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सारीकाताई पारवे, रुपालीताई ठाकरे, प्रभावती अन्नपुर्वे, विजया कातकडे, दिपाली वाघ, अपर्णा जोशी, रोहिणी हलगे, बालिका सुरनर, किर्ती क्षिरसागर यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी झाल्या.

टैग्स: BJP Mahila Morcha