Bhadgaon Murder

जळगावच्या भडगावमध्ये रुद्राक्ष विक्रीच्या पैशांवरून वाद विकोपाला; बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे आढळली

भडगावमध्ये 800 रुपयांच्या वादातून तरुणाचा मृत्यू झाला. संशयित आरोपीला पोलिसांनी शेतातून ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जळगावच्या भडगावमध्ये रुद्राक्ष विक्रीच्या पैशांवरून वाद विकोपाला; बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे आढळली

Bhadgaon Murder

भडगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात अवघ्या 800 रुपयांच्या पैशांच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मा जुगा पवार असे मृत तरुणाचे नाव असून, जुगा कांतिलाल पवार हा या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. भडगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

धर्मा पवार आणि जुगा पवार हे दोघेही गावोगावी फिरून बनावट रुद्राक्ष विक्रीचे काम करत होते. घटनेच्या दिवशी धर्मा याने 800 रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास दोघे भडगाव स्टेशन परिसरात दारू पिण्यासाठी बसले. यावेळी रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या 800 रुपयांच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद झाला.

पैशांवरून सुरू झालेला वाद वाढल्यानंतर जुगा पवार याने जवळ पडलेल्या दगडाने धर्मा पवार याच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या घटनेत धर्मा याचा मृत्यू झाला.

आरोपी शेतात आढळला

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जवळच्या शेतातून कुत्रे भुंकत असल्याचा आवाज येत असल्याने पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला. त्यावेळी आरोपी जुगा पवार हा दारूच्या नशेत शेतात बसलेला आढळून आला.

पोलिसांनी आरोपीची बॅग तपासली असता त्यामध्ये मृत धर्मा पवार याचे दात आणि खाण्यासाठी ठेवलेली दोन जिवंत कबुतरे आढळून आली. या प्रकारामुळे तपास पथकाला धक्का बसला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

खरवड शिवारात विवाहितेची हत्या; सासू गंभीर जखमी

खरवड शिवारात विवाहितेची हत्या; सासू गंभीर जखमी

Kalamnuri Murder Case: कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात कौटुंबिक वादातून २४ वर्षीय विवाहितेची हत्या झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेत विवाहितेची सासू गंभीर जखमी झाली.

Oct 15, 2026
मेरठच्या ब्लू ड्रम हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाला फाशीची शिक्षा; न्यायालयाचा मोठा निर्णय

मेरठच्या ब्लू ड्रम हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाला फाशीची शिक्षा; न्यायालयाचा मोठा निर्णय

मेरठच्या ब्लू ड्रम हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाला फाशीची शिक्षा. सौरभ राजपूत हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय.

Oct 14, 2026
वडिलांनी कर्ज काढून लावले लग्न; पतीच्या नोकरीबाबत फसवणूक; चार महिन्यांतच 23 वर्षीय संजनाची आत्महत्या

वडिलांनी कर्ज काढून लावले लग्न; पतीच्या नोकरीबाबत फसवणूक; चार महिन्यांतच 23 वर्षीय संजनाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 वर्षीय संजनाची आत्महत्या. पतीच्या सरकारी नोकरीबाबत फसवणूक आणि सासरच्या छळाचा नातेवाइकांचा आरोप. बेगमपुरा पोलिसांकडून तपास सुरू.

Oct 14, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! हेल्मेटधारी आरोपीबाबत मुलाचा संशय; मीनाक्षी शिंदेंवर कारवाईची मागणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! हेल्मेटधारी आरोपीबाबत मुलाचा संशय; मीनाक्षी शिंदेंवर कारवाईची मागणी

ठाणे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात हेल्मेटधारी आरोपीबाबत मुलाचा संशय. राम पूर्णेकर यांची CBI-CID चौकशी आणि मीनाक्षी शिंदेंवर कारवाईची मागणी.

Oct 13, 2026
सोमठाणा तिहेरी हत्याकांड: आरोपी दीपक सुरडकर व जगदीश सुरडकर दोघांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

सोमठाणा तिहेरी हत्याकांड: आरोपी दीपक सुरडकर व जगदीश सुरडकर दोघांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

Somthana Triple Murder Case: या प्रकरणातील दुसरा आरोपी जगदीश दीपक सुरडकर हादेखील अटकेत असून, आता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Oct 11, 2026