Baramati Double Murder

बारामती दुहेरी हत्याकांडाने हादरली; झोपेत असताना दोन महिलांची गळा चिरून हत्या

बारामतीच्या शेरेवाडीत दोन महिलांची झोपेत असताना गळा चिरून हत्या. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत यांचा मृत्यू; आरोपीचा शोध सुरू.

बारामती दुहेरी हत्याकांडाने हादरली; झोपेत असताना दोन महिलांची गळा चिरून हत्या

बारामती दुहेरी हत्याकांडाने हादरली. बारामतीमध्ये दोन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री झोपेत असताना या महिलांवर चाकूने वार करत जागीच संपवण्यात आले. बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्री दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत या दोघी घरामध्ये झोपेत असताना त्यांची हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांचे मृतदेह आढळून आले. घराच्या आतील दृश्य पाहून सर्वजण घाबरले. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. हत्या करून आरोपी फरार झाला आहे. या हत्येमागील कारण तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

संबंधित सामग्री

महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गोंधळ! केंद्रावर संगणकच नाही; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गोंधळ! केंद्रावर संगणकच नाही; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Mahajyoti Scholarship Exam: महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राईट स्कूलमध्ये पोहोचलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा न देताच तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागली.

Oct 08, 2026
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026