बजाज फायनान्स ऑफिस

बजाज फायनान्सच्या ऑफिसवर शिवसेनेची धडक!

Bajaj Finance Office: दुष्काळी परिस्थितीत दमदाटी करून कर्ज वसुली केली जात असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बजाज फायनन्स..

बजाज फायनान्सच्या ऑफिसवर शिवसेनेची धडक!

Bajaj Finance Office

 

सक्तीच्या कर्ज वसुलीबद्दल आ.अंबादास दानवे यांनी केली अधिकाऱ्यांची खरडपट्टी!

लातूर (Bajaj Finance Office) : दुष्काळी परिस्थितीत दमदाटी करून कर्ज वसुली केली जात असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील बार्शी रोडवरील बजाज फायनन्स कार्यालयातील अधिकाऱ्यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भेट घेऊन समज दिला. यावेळी शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते आ.अंबादास दानवे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली.

सध्या लातूर जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती पिके वाया गेल्याने शेतकरी, शेतमजूर, वाहन चालक हैराण आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, विविध मार्गांनी घेतलेल्या कर्जदारांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य होत आहे. अशा कठीण काळात नागरिकांना सहकार्य करण्याऐवजी बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुलीसाठी नागरिकांना फोनवरून दमदाटी करणे, घरी येऊन दबाव टाकणे, वाहन ताब्यात घेणे, अशा विविध मार्गांने मानसिक त्रास दिला जात असल्याच्या असंख्य लेखी तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने बजाज फायनान्सच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीने स्पष्ट भूमिका मांडण्यात आली की, "दुष्काळाच्या काळात वसुलीच्या नावाखाली कोणत्याही नागरिकाला त्रास दिला जाणार नाही. कंपनीने मानवीय दृष्टिकोन ठेवून वसुली प्रक्रिया राबवावी आणि नागरिकांशी सन्मानाने वागावे. जर यापुढेही दमदाटीचा प्रकार सुरूच राहिला तर शिवसेना स्टाईलने  तीव्र आंदोलन छेडेल जाईल यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची राहील, असा इशारा जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, तालुका प्रमुख शंकर रांजनकर, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, शहर प्रमुख शिवराज मुळावकर, माधव कलमुकले, फेरीवाले संघटना जिल्हाध्यक्ष हनुमंत  पडवळ, तालुका सचिव महादेव काळे, शहर संघटक समद शेख,उपशहर प्रमुख सुनील कापसे, ऋषिकेश पाटील, विखार देशमुख शिवसैनिक आशिष खोबरे, आकाश तिरुके आजि माझी पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

टैग्स: Bajaj Finance Office